• About
  • Contact
  • Stories
  • आपली अमेरिका
  • कम्युनिटी
  • टेक्नोलॉजी
  • ट्रॅव्हल
  • लाईफ
  • कल्चर
Logo
  • About
  • Contact
  • Stories
  • आपली अमेरिका
  • कम्युनिटी
  • टेक्नोलॉजी
  • ट्रॅव्हल
  • लाईफ
  • कल्चर
Logo
Logo
कम्युनिटी

गणिताचा तपस्वी: प्रा. श्रीराम शंकर अभ्यंकर

2 Mins read
American Marathi
Abhyankar_Grothendieck_1536x1024

Listen to the audio of the story:

१९३० साली मध्य प्रदेशातील उज्जैन येथे जन्मलेल्या अभ्यंकर यांचे लहानपण अत्यंत साध्या वातावरणात गेले. परंतु लहानपणापासूनच गणिताविषयीची त्यांची ओढ आणि जिज्ञासा विलक्षण होती. भारतात शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी प्रयाण केले. त्या काळात परदेशात शिक्षण घेणे हे फार मोठे आव्हान होते. आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिक अशा अनेक अडचणींना सामोरे जात त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात गणितातील संशोधन सुरू केले.

भारतीयांनी वेगवेगळ्या क्षेत्रात जागतिक पातळीवर वर्षनुवर्ष आपली छाप पाडली आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यकीय संशोधन, उद्योग आणि अशा इतर अनेक क्षेत्रांत भारतीयांनी बजावलेल्या कामगिरीला आज जगभरात मान्यता आहे.या प्रेरणादायी यशकथांमधली काही नावं प्रकाशझोतात तुलनेने कमी राहिली असली तरी या व्यक्तींचं योगदान दूरगामी स्वरुपाचं राहिलं आहे. प्रा. श्रीराम शंकर अभ्यंकर हे त्यापैकीच एक.

हार्वर्डमध्ये त्यांना प्रख्यात गणितज्ञ ऑस्कर झारिस्की यांचे मार्गदर्शन लाभले. याच काळात त्यांनी अल्जेब्रिक जिओमेट्री या अत्यंत गुंतागुंतीच्या शाखेत आपले संशोधन सुरू केले. ही शाखा गणितातील आकृती, संरचना आणि त्यामागचं तर्कशास्त्र यांचा सखोल अभ्यास करते. अभ्यंकरांनी या क्षेत्रात केलेल्या संशोधनामुळे या शाखेतले नवे आयाम खुले झाले.

हार्वर्ड विद्यापीठात डिग्री मिळवल्यावर त्यांनी अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठात प्राध्यापक म्हणून दीर्घकाळ काम केले. तेथे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याबरोबरच संशोधनाला चालना दिली आणि गणितज्ञांच्या आंतरराष्ट्रीय समुदायात आपले वेगळे स्थान निर्माण केले. त्यांची शिकवण्याची शैली कठोर पण प्रेरणादायी होती.

विद्यार्थ्यांना ते नेहमी सांगत, “गणित म्हणजे फक्त सूत्रे नाहीत, तर ती विचार करण्याची एक पद्धत आहे.” परदेशात राहूनही अभ्यंकरांचा भारताशी संबंध कधी तुटला नाही. त्यांनी भारतीय तरुणांना गणितात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित केले. याच भावनेतून त्यांनी पुण्यात भास्कराचार्य प्रतिष्ठान या गणित संशोधन संस्थेची स्थापना केली. ही संस्था पुढे अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरली. ग्रामीण आणि शहरी भागातील गणितप्रेमी विद्यार्थ्यांना संधी देणे, स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणे आणि संशोधनाचा पाया मजबूत करणे अशा अनेक बाबतीत या संस्थेने महत्त्वाची भूमिका बजावली.

अभ्यंकरांचे संशोधन केवळ गणितापुरते मर्यादित राहिले नाही. त्यांनी रोबोटिक्स, संगणक सहाय्यित रचना (Computer-aided design) आणि इतर आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रांशी गणिताचे नाते जोडण्याचा प्रयत्न केला.

गणित हा फक्त पुस्तकांमध्ये बंदिस्त करण्याचा विषय नसून त्यात जगाच्या प्रगतीची बीजं आहेत, हे त्यांच्या कामातून सतत दिसून येत राहिलं.

अभ्यंकरांनी त्यांच्या कामातून भारतीय आणि पाश्चिमात्य जगाला एकत्र आणले. एकीकडे त्यांनी अमेरिकन संशोधनविश्वात भारतीय बुद्धिमत्तेची ताकद दाखवून दिली, तर दुसरीकडे भारतीय विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर विचार करण्याची प्रेरणा दिली.

आयुष्याच्या शेवटपर्यंत ते संशोधनात गुंतून राहिले. गणित ही त्यांच्यासाठी एक पैसे कमवायचं साधन नव्हतं, तर एक साधना होती. त्यांची ही आजन्म साधना २०१२ साली पूर्णत्वाला गेली. त्यांचे सहकारी आणि विद्यार्थी त्यांना गणिताची तपस्वी म्हणायचे.

आज भारतीय डायस्पोराच्या कथा सांगताना आपण उद्योजक, तंत्रज्ञ किंवा डॉक्टरांचा उल्लेख करतो. परंतु प्रा. श्रीराम अभ्यंकरांसारख्या संशोधकांची कहाणीही तितकीच महत्त्वाची आहे.

त्यांचं जीवन तरुणांना एक साधा पण महत्त्वाचा संदेश देते: स्वप्न मोठे असले पाहिजेच!

MAIN IMAGE COURTSEY: Mathematisches Forschungsinstitut Oberwolfach

Sharing is Caring
Write Comment
Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous Post

नक्की वाचा: द बँकर हू मेड अमेरिका

Next Post

चाटानुगा : नजरेआडचं सीनिक सीक्रेट 

Photo of the week

Yosemite National Park

अमेरिकेतील निसर्गाचे भव्य आणि सुंदर रूप अनुभवायचे असेल, तर Yosemite National Park हे एक आवर्जून भेट देण्यासारखे ठिकाण आहे. आकाशाला भिडणारे ग्रॅनाइटचे डोंगर, शेकडो फूट उंचीवरून कोसळणारे धबधबे, प्रचंड आकाराची Sequoia झाडे, हिरवीगार कुरणे आणि स्वच्छ डोंगरी तलाव यामुळे Yosemite हे अमेरिकेतील सर्वात प्रसिद्ध National Parks पैकी एक आहे.

Most Popular

AP Classes :एक अनुभव

Students friends at lockers room

अमेरिकेच्या स्वातंत्र्योत्सवाची २५० वर्षं: देश घडवणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची  गोष्ट – जॉन ॲडम्स

John Adams Resized

योसेमिटी नॅशनल पार्क:आयुष्यभर लक्षात राहणारा अनुभव

WhatsApp Image 2026-09-08 at 1.19.19 PM
Categories
Lifestyle
Technology
Travel
Tags
250 years of USA adventure American Chattanooga Founding Fathers fun gem hidden IndiaAmerican Indian John Admas Marathi President Travel USa USA history
You might also like
809133902_1866938554623559_2883314826009152861_n
कम्युनिटी लाईफ

अमेरिकेतला गणेशोत्सव: श्रद्धेपासून संस्कृतीपर्यंत

6 Mins read
September 21, 2026

गेल्या काही वर्षांत अमेरिकेतील गणेशोत्सवाचे स्वरूप मोठ्या प्रमाणावर विस्तारले आहे. २०२६ मध्ये गणेश चतुर्थी १४ सप्टेंबरला असून ती अमेरिकेत सार्वजनिक सुट्टी नसली, तरी न्यू जर्सी, न्यूयॉर्क, फिलाडेल्फिया, वॉशिंग्टन डीसी परिसर, टेक्सास, कॅलिफोर्निया, शिकागो आणि सिएटल सह अनेक शहरांमध्ये मंदिरे, महाराष्ट्र मंडळे आणि इतर भारतीय संस्था सार्वजनिक गणेशोत्सव आयोजित करत आहेत. काही मोठ्या उत्सवांना हजारो भाविक …

Main photo
कम्युनिटी

मुंबई ते ॲरिझोना : शची काळे यांचा प्रेरणादायी कलाप्रवास

4 Mins read
September 8, 2026

लेखक: रोहित कुलकर्णी/शुभदा सुभेदार ही मुलाखत ऐकण्यासाठी येथे क्लिक करा. Spotify or Apple Podcast “मला आर्टिस्ट व्हायचंच आहे,” हे शची काळे यांनी लहानपणीच ठरवले होते. अनेक भारतीय मुलांप्रमाणे त्यांच्यावर डॉक्टर, इंजिनिअर किंवा वकील होण्याचा दबाव कधीच आला नाही, उलट त्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्या स्वप्नाला नेहमीच पाठिंबा दिला आणि हाच विश्वास त्यांना मुंबईतून अमेरिकेतील अँरिझोनापर्यंत घेऊन आला. …

Anirudh Joshi
कम्युनिटी

कॉर्पोरेट जगतातून फ्लोरिडाच्या अमराईत: अनिरुद्ध जोशींची दुसरी इनिंग

4 Mins read
August 30, 2026

कार्पोरेट जगतातून थेट अमराईत : फ्लोरिडामध्ये आंब्यांच्या माध्यमातून दुसरी इनिंग खेळणारे,अनिरुद्ध जोशी. ही मुलाखत Spotify किंवा Apple Podcast वर ऐका. बहुतेक लोक निवृत्ती नंतर शांत आयुष्याची कल्पना करतात – प्रवास करणे, गोल्फ खेळणे अथवा कुटुंबासमवेत वेळ घालवणे. परन्तु अनिरुद्ध जोशी यांनी मात्र वेगळाच मार्ग निवडला. अनिरुद्ध यांनी टेलिकॉम क्षेत्रात जवळपास तीन दशकांची यशस्वी कारकीर्द घडवल्या …

© 2026 | American Marathi
Logo
  • About
  • Contact
  • Stories
  • आपली अमेरिका
  • कम्युनिटी
  • टेक्नोलॉजी
  • ट्रॅव्हल
  • लाईफ
  • कल्चर
Logo
  • About
  • Contact
  • Stories
  • आपली अमेरिका
  • कम्युनिटी
  • टेक्नोलॉजी
  • ट्रॅव्हल
  • लाईफ
  • कल्चर

Rohit Kulkarni

Founder,American Marathi

Hi,this is a dummy bio and can be replaced. Thank you!

ट्रीलियन डाॅलर अर्थव्यवस्था :अमेरिकेतील सरकारी शाळांना एवढा पैसा कुठून मिळतो ?

अमेरिकेच्या स्वातंत्र्योत्सवाची २५० वर्षं: देश घडवणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची  गोष्ट: अलेक्झांडर हॅमिल्टन

अमेरिकेतला गणेशोत्सव: श्रद्धेपासून संस्कृतीपर्यंत