• About
  • Contact
  • Stories
  • आपली अमेरिका
  • कम्युनिटी
  • टेक्नोलॉजी
  • ट्रॅव्हल
  • लाईफ
  • कल्चर
Logo
  • About
  • Contact
  • Stories
  • आपली अमेरिका
  • कम्युनिटी
  • टेक्नोलॉजी
  • ट्रॅव्हल
  • लाईफ
  • कल्चर
Logo
Logo
आपली अमेरिका

अमेरिकेच्या स्वातंत्र्योत्सवाची २५० वर्षं: देश घडवणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची  गोष्ट – जॉन ॲडम्स

3 Mins read
nebulacontentinc
John Adams Resized
Click here to listen to the story.

 २०२६ या वर्षात, अमेरिकेला स्वातंत्र्य मिळून २५० वर्षं झाली. हा प्रसंग साजरा करत असताना अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या शिल्पकारांचं स्मरण करणं अगत्याचं ठरतं. ज्या थोर स्त्री पुरुषांनी स्वतंत्र अमेरिकेच्या उभारणीत आपलं लक्षणीय योगदान दिलं अशा नेत्यांच्या, विचारवंतांच्या, सुधारकांच्या, संशोधकांच्या आणि द्रष्ट्यांच्या कथा आपण या विशेष लेखमालेतून जाणून घेणार आहोत.  अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा विचार करताना सर्वप्रथम उल्लेख करायला हवा तो राष्ट्रपिता थॉमस जेफरसन यांचा. ते स्वातंत्र्य आणि शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या विचारांचा प्रभाव आजदेखील जाणवतो. अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याचा मसुदा तयार करण्याच्या कामी त्यांना जॉन ॲडम्स यांनी साहाय्य केलं होतं. आपला दृढ विवेक, तत्वनिष्ठा, कठोर परिश्रम त्याचप्रमाणे तेजस्वी लेखणीमुळे ते अमेरिकेचा कणा म्हणूनच ओळखले जातात. त्यांनीच अमेरिकेला प्रामाणिकपणा, कायदा आणि सुव्यवस्थेची देणगी दिली आहे. 

सुरुवातीचे आयुष्य

जॉन ॲडम्स यांचा जन्म ३० ऑक्टोबर १७३५ रोजी मॅसॅच्युसेट्स राज्यात,  डिकन ऍडम्स आणि सुझॅना बॉयल्स्टन या दांपत्यापोटी,  ब्रेन्ट्री येथे झाला. त्यांचे वडील शेतकरी आणि  चर्मकार होते. वडिलांकडून नीतिमत्ता आणि चळवळ्या स्वभाव त्यांना वारशात मिळाला होता. अॅडम्स लहानपणापासून बुद्धिमान, मेहनती आणि गंभीर स्वभावाचे होते.

वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी हार्वर्ड कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. १७५५ साली कायद्याची पदवी प्राप्त केली.  पुढे वकील म्हणून काम करताना त्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध जनमानसात वाढणारी नाराजी जवळून पाहिली. भोवतालची परिस्थिती एक ना एक दिवस सुधारेल अशी त्यांना वाटणारी आशा दशकभरातच मावळली. 

क्रांतीपूर्व काळ

१७६५ मध्ये ब्रिटिश संसदेनं स्टॅम्प अॅक्ट मंजूर केला. . या कायद्यातल्या जुलुमी तरतुदींना विरोध करणारा ‘कॅनन आणि फ्युडल लॉ’वर त्यांनी निबंध लिहिला. तो इंग्लंडभर गाजला. या निबंधाने ते एक विद्वान टीकाकार म्हणून प्रसिद्धी पावले.  मात्र ते नेहमी कायद्याचा आदर करणारे होते.

१७७० साली झालेल्या बोस्टन हत्याकांड प्रकरणात ऍडम्स यांनी ब्रिटिश सैनिकांच्या बाजूने खटला लढवला आणि त्यांची निर्दोष मुक्तता करवली. त्यांच्या दृष्टीने लोकप्रियतेपेक्षा कायदा महत्वाचा होता. १७७४ मध्ये ते पहिल्या कॉन्टिनेंटल काँग्रेसमध्ये सहभागी झाले. १७७६ पर्यंत ते स्वातंत्र्याचे खंदे पुरस्कर्ते बनले. कॉन्टिनेंटल आर्मीचंचं नेतृत्व करण्यासाठी त्यांनी जॉर्ज वॉशिंग्टन यांचं नामनिर्देशन केलं. ते दुसऱ्या काँटिनेंटल काँग्रेसमध्ये राष्ट्राचे आधारस्तंभ म्हणून ओळखले जाऊ लागले. 

 स्वातंत्र्याचा जाहीरनामा आणि मुत्सद्देगिरी 

स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याचा मसुदा थॉमस जेफरसन यांनी लिहिला असला तरी त्या जाहीरनाम्याला काँग्रेसमध्ये जोरदार पाठिंबा देण्याचं काम जॉन ॲडम्स यांनी केलं. आपल्या प्राणाचीही पर्वा न करता त्यांनी त्या जाहीरनाम्यावर  स्वाक्षरी करून ब्रिटिश राजसत्तेला थेट आव्हान दिले.

१७७९ मध्ये ऍडम्स यांना युरोपमध्ये पाठवण्यात आलं. त्यांनी नेदरलँड्सकडून आर्थिक मदत मिळवली. १७८३ च्या पॅरिस कराराने युद्ध संपुष्टात आलं. अमेरिकेची पश्चिम सीमा मिसिसिपीपर्यंत विस्तारून, देशाच्या सार्वभौमत्वाला पुष्टी मिळण्यात जॉन ऍडम्स यांची रोखठोक भूमिका फार महत्वाची ठरली. 

सरकारविषयक विचार

अमेरिकन घटनेचा वैचारिक पाया जॉन ॲडम्स यांनी घातला. सशक्त लोकशाहीसाठी संतुलित शासनव्यवस्था, द्विसदनीय विधिमंडळ आणि स्वायत्त न्यायव्यवस्था असावी असं प्रतिपादन त्यांनी केलं. सद्वर्तन, नैतिकता, संस्थात्मक रचना या बाबींवरील त्यांच्या विश्वासाने केवळ अमेरिकेच्याच नव्हे तर इतर अनेक राज्यांच्या संवैधानिक घटनांवर प्रभाव पडला. 

उपराष्ट्राध्यक्ष आणि राष्ट्राध्यक्ष

१७८९ मध्ये ॲडम्स अमेरिकेचे पहिले उपराष्ट्राध्यक्ष झाले. त्यांच्या मते हे पद अत्यंत गौण होतं. मात्र तरीही, त्यांनी हा पदभार सांभाळताना चांगला आदर्श घालून दिला. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी तब्बल ३१ वेळा त्यांचं टाय ब्रेकर मत दिलं. आजवरच्या कोणाही उपराष्ट्राध्यक्षाने ही संख्या गाठलेली नाही. त्यांचं झुकतं माप संघराज्यवाद्यांच्या बाजूने होतं त्यामुळे सरकारचं सशक्तीकरण झालं. उपराष्ट्राध्यक्षपदासाठी अपेक्षित असणारी तटस्थता आणि शुचिता अबाधित राखण्यासाठी ऍडम्स यांनी संसदेतल्या वादविवादात सहभागी होणं अथवा प्रवास करणं टाळलं. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी लिहिलेल्या पत्रांमधून त्यांच्या नैराश्यासोबतच त्यांचा संविधानावरचा अढळ विश्वास आणि संयम यांचं दर्शन घडतं. 

निवडणुकीत आपले पूर्वीचे सहकारी थॉमस जेफरसन यांच्यावर मात करत जॉन ॲडम्स हे जॉर्ज वॉशिंग्टन यांच्यानंतर झालेले अमेरिकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष. त्यांच्या कार्यकाळात फ्रान्सशी तणाव वाढला.  पॅरिस करारामुळे संतप्त झालेल्या फ्रेंच नेतृत्वाने अमेरिकन जहाजांवर हल्ले सुरु केले. तेंव्हा ऍडम्स  यांनी १७९८ मध्ये आपलं आरमार शक्तिशाली बनवलं मात्र प्रत्यक्ष युद्ध टाळलं. या प्रकारात ॲडम्स यांचं राजकीय स्थान धोक्यात आलं मात्र अमेरिकेचं नवोदित गणराज्य सुरक्षित राहिलं. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी ॲडम्स यांनी एलियन आणि सेडिशन कायद्यांना मंजुरी दिली.  पुढे एक्स वाय झेड प्रकरणामुळे अमेरिकन नागरिकांमध्ये नाराजी पसरली. १८०० सालची निवडणूक आपले प्रतिस्पर्धी जेफरसन यांच्याकडून हरल्यानंतर जॉन ऍडम्स १८०१ साली नवोदित लोकशाहीवादी राष्ट्राचे आदर्श राष्ट्राध्यक्ष म्हणून निवृत्त झाले.

निवृत्ती आणि वारसा

राष्ट्राध्यक्षपद सोडल्यानंतर ॲडम्स मॅसॅच्युसेट्स राज्यामध्ये क्विन्सी शहरात राहू लागले. पुढील पंचवीस वर्षांमध्ये त्यांनी अनेक पत्रं, आठवणी आणि आत्मपरीक्षणपर असं विपुल लेखन केलं. थॉमस जेफरसन यांच्याशी त्यांचा विविध विषयांवरचा पत्रव्यवहार अमेरिकन इतिहासात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आपला पुत्र जॉन क्विन्सी ऍडम्स हा अमेरिकेचा सहावा राष्ट्राध्यक्ष झालेला बघण्याचं भाग्य त्यांना लाभलं. 

जॉन ॲडम्स यांनी एकदा लिहिलं होतं की स्वातंत्र्य टिकवण्यासाठी किती किंमत मोजावी लागली हे पुढील पिढ्यांना कदाचित कधीच पूर्णपणे कळणार नाही. पण कायद्याचा सन्मान, शांततापूर्ण सत्ता हस्तांतरण आणि तत्त्वनिष्ठ नेतृत्व यामध्ये अॅडम्स यांचा वारसा आजही टिकून आहे.

250 years of USA Founding Fathers John Admas President USA history
Sharing is Caring
Write Comment
Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous Post

चाटानुगा : नजरेआडचं सीनिक सीक्रेट 

Next Post

ख्रिस्तोफर नोलन : आधुनिक चित्रपटसृष्टीला नवी दिशा देणारा दिग्दर्शक

Photo of the week

St. Louis, Missouri, USA Skyline

सेंट लुईस हे मिसुरी राज्यातील मिसिसिपी नदीकिनारी वसलेलं एक मोठं शहर आहे. इथलं प्रसिद्ध ६३० फूट उंच Gateway Arch स्मारक १९६० च्या दशकात बांधण्यात आलं. हे स्मारक Lewis आणि Clark यांच्या १९व्या शतकाच्या सुरुवातीच्या मोहिमांना आणि अमेरिकेच्या पश्चिमेकडील विस्ताराच्या इतिहासाला समर्पित आहे.

Most Popular

चाटानुगा : नजरेआडचं सीनिक सीक्रेट 

Chattanooga, Tennessee, USA city

आकाशाला गवसणी घालणारे शहर

Skyline of Chicago, United States

कथा फर्स्ट अमेंडमेंटची

first amendment
Categories
Lifestyle
Technology
Travel
Tags
250 years of USA adventure American Chattanooga Founding Fathers fun gem hidden IndiaAmerican Indian John Admas Marathi President Travel USa USA history
You might also like
Thomas Jefferson resized
आपली अमेरिका

अमेरिकेच्या स्वातंत्र्योत्सवाची २५० वर्षं: देश घडवणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची  गोष्ट:थॉमस जेफरसन

4 Mins read
July 15, 2026

एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व, थोर विचारवंत आणि अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा व राष्ट्राचा शिल्पकार. स्वातंत्र्य,व्यक्तिस्वातंत्र्य आणि  लोकशाही या मूल्यांवर ठाम असणारे थाॅमस जेफरसन यांनी अमेरिकेच्या इतिहासावर अमिट ठसा उमटवला. त्यांनी लिहिलेल्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याने (Declaration of Independence) एका नव्या राष्ट्राचा पाया घातला. अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष, दूरदृष्टीचे नेते आणि शिक्षणाचे समर्थक म्हणून त्यांचे नाव आजही मोठ्या आदराने घेतले जाते. सुरुवातीचे …

Skyline of Chicago, United States
आपली अमेरिका

आकाशाला गवसणी घालणारे शहर

5 Mins read
May 24, 2026

शिकागोची गगनचुंबी कहाणी गगनचुंबी इमारतींचा इतिहास म्हणजे आधुनिक शहरांच्या विकासाचीच कहाणी आहे. हजारो वर्षांपासून जगात उंच बांधकामे होती — जसे इजिप्तचे पिरॅमिड किंवा युरोपमधील प्राचीन चर्च — पण आधुनिक अर्थाने “स्कायस्क्रॅपर” म्हणजेच गगनचुंबी इमारतींची सुरुवात १९व्या शतकाच्या शेवटी Chicago येथे झाली. १८७१ मध्ये शिकागोमध्ये मोठी आग लागून शहराचा मोठा भाग नष्ट झाला. शहर पुन्हा उभे …

first amendment
आपली अमेरिका

कथा फर्स्ट अमेंडमेंटची

3 Mins read
April 30, 2026

लोकशाहीच्या नसानसांत भिनलेले स्वातंत्र्य अमेरिकन संविधानातली पहिली अमेंडमेंट (First Amendment) १५ डिसेंबर १७९१ रोजी मंजूर करण्यात आली. फर्स्ट अमेंडमेट (शब्दश: अर्थ: पहिली घटनादुरूस्ती) प्रामुख्याने अभिव्यक्तिस्वातंत्र्य, धर्मस्वातंत्र्य, माध्यमस्वातंत्र्य आणि सरकारकडे तक्रार/ मागणी मांडण्याच्या हक्काचे संरक्षण करते.फर्स्ट अमेंडमेंटचा मुख्य मजकूर असा आहे:“अमेरिकन संसद असा कोणताही असा कायदा करणार नाही जो एखाद्या धर्माची स्थापना करेल किंवाधर्मस्वातंत्र्यावर घाला घालेल. …

© 2026 | American Marathi
Logo
  • About
  • Contact
  • Stories
  • आपली अमेरिका
  • कम्युनिटी
  • टेक्नोलॉजी
  • ट्रॅव्हल
  • लाईफ
  • कल्चर
Logo
  • About
  • Contact
  • Stories
  • आपली अमेरिका
  • कम्युनिटी
  • टेक्नोलॉजी
  • ट्रॅव्हल
  • लाईफ
  • कल्चर

Rohit Kulkarni

Founder,American Marathi

Hi,this is a dummy bio and can be replaced. Thank you!

अमेरिकेच्या स्वातंत्र्योत्सवाची २५० वर्षं: देश घडवणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची  गोष्ट:थॉमस जेफरसन

 हायस्कुलमधल्या विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा 

तांत्रिक क्रांतीची दोन रूपं – भारतातला UPI आणि अमेरिकेतला AI