• About
  • Contact
  • Stories
  • आपली अमेरिका
  • कम्युनिटी
  • टेक्नोलॉजी
  • ट्रॅव्हल
  • लाईफ
  • कल्चर
Logo
  • About
  • Contact
  • Stories
  • आपली अमेरिका
  • कम्युनिटी
  • टेक्नोलॉजी
  • ट्रॅव्हल
  • लाईफ
  • कल्चर
Logo
Logo
आपली अमेरिका

कथा फर्स्ट अमेंडमेंटची

3 Mins read
American Marathi
first amendment

लोकशाहीच्या नसानसांत भिनलेले स्वातंत्र्य

अमेरिकन संविधानातली पहिली अमेंडमेंट (First Amendment) १५ डिसेंबर १७९१ रोजी मंजूर करण्यात आली. फर्स्ट अमेंडमेट (शब्दश: अर्थ: पहिली घटनादुरूस्ती) प्रामुख्याने अभिव्यक्तिस्वातंत्र्य, धर्मस्वातंत्र्य, माध्यमस्वातंत्र्य आणि सरकारकडे तक्रार/ मागणी मांडण्याच्या हक्काचे संरक्षण करते.
फर्स्ट अमेंडमेंटचा मुख्य मजकूर असा आहे:
“अमेरिकन संसद असा कोणताही असा कायदा करणार नाही जो एखाद्या धर्माची स्थापना करेल किंवा
धर्मस्वातंत्र्यावर घाला घालेल. संसद कुठल्याही कायद्याद्वारे भाषणस्वातंत्र्य आणि माध्यमस्वातंत्र्याला बाधा आणणार नाही आणि त्याचप्रमाणे शांततापूर्ण मार्गाने एकत्र येण्याच्या आणि सरकारकडे तक्रार करण्याच्या हक्कावर गदा आणणार नाही.”

फर्स्ट अमेंडमेंटवर तत्कालीन सामाजिक, धार्मिक आणि राजकीय परिस्थितीचा मोठा प्रभाव होता. त्या काळात वेगवेगळ्या अमेरिकन वसाहतींमध्ये वेगवेगळे धर्म आणि धार्मिक प्रथा पाळल्या जात होत्या. काही ठिकाणी प्युरिटन लोक होते, काही ठिकाणी अँग्लिकन, तर काही भागात क्वेकर, लुथेरन आणि इतर गट होते. काही ठिकाणी कॅथोलिक आणि ज्यू समुदायही होते.

त्या काळात धार्मिक नेत्यांकडे राजकीय ताकद होती. काही धार्मिक अधिकारी लोकांकडून करही (tax) गोळा करत असत. जे लोक कर देत नसत किंवा परवानगीशिवाय धर्मप्रचार करत असत, त्यांच्यावर कारवाई केली जात असे.

१७७६ मध्ये अमेरिकेने आपले स्वातंत्र्य जाहीर केल्यावर तिथल्या अनेक नेत्यांना असं वाटलं की सरकारने लोकांना एका विशिष्ट धर्माचे पालन करायला भाग पाडणे योग्य नाही. त्यामुळे फर्स्ट अमेंडमेंटमध्ये असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलं की सरकार कोणताही धर्म स्थापन करू शकत नाही. नंतरच्या काळात अमेरिकेतल्या राज्य सरकारांनीही त्यांच्या कायद्यांमध्ये हेच तत्त्व स्वीकारले.
या अमेंडमेंटने सरकारला फक्त धर्मस्थापनेपासून रोखलेलं नाही, तर प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या पसंतीचा धर्माचे पालन करण्याचं स्वातंत्र्यही दिलं आहे. त्या काळात अनेक लोक युरोपमध्ये होणाऱ्या छळ आणि भेदभावापासून दूर जाण्यासाठी अमेरिकेत आले होते. त्यामुळे धर्मस्वातंत्र्य हा अमेरिकन क्रांतीचा एक महत्त्वाचा भाग बनला.

फर्स्ट अमेंडमेंटचे मुख्य लेखक होते जेम्स मॅडिसन.
भाषण आणि माध्यमस्वातंत्र्याच्या बाबतीतही ही अमेंडमेंट महत्त्वाची आहे. सुरूवातीला फक्त अमेरिकन
संसदेला फर्स्ट अमेंडमेंट लागू होती. पण नंतरच्या काळात अमेरिकन सुप्रीम कोर्टाने देशातल्या सर्व सरकारी पातळींवर, मग ते राज्य सरकार असो वा केंद्र किंवा स्थानिक, ही अमेंडमेंट लागू केली.
खाजगी संस्थांना मात्र हे नियम लागू होत नाहीत.

विसाव्या शतकात फर्स्ट अमेंडमेंटने दिलेल्या स्वातंत्र्याचा अमेरिकन जीवनाच्या विविध पैलूंवर प्रभाव पडला. १९२५ साली गिटलो विरूध्द न्यूयॉर्क केसनंतर फर्स्ट अमेंडमेंट अमेरिकेतल्या सर्व सरकारी पातळीवर लागू झाले. त्यानंतर रेडिओ, चित्रपट, टीव्ही, व्हिडिओ गेम्स आणि इंटरनेट यांवरही ही तत्वे लागू झाली.

पण फर्स्ट अमेंडमेंटने दिलेल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यालाही काही मर्यादा आहेत. खालील काही बाबतीत या स्वातंत्र्यावर गदा येऊ शकते.
 खोटी बदनामी (defamation)
 अश्लील सामग्री
 जिवाला धोका देणाऱ्या धमक्या
 व्यावसायिक जाहिराती
फर्स्ट अमेंडमेंटअंतर्गत येणारा शांततापूर्ण सभा घेण्याचा तसेच सरकारकडे तक्रार करण्याचा अधिकारही महत्त्वाचा आहे (Right to petition).

नागरिक शांततापूर्ण मार्गाने एकत्र येऊन आपले विचार मांडू शकतात तसंच आंदोलनही करू शकतात.
अमेरिकेत चळवळींचा मोठा इतिहास आहे. महिला हक्क चळवळ, गुलामगिरीविरोधी चळवळ, तसेच कामगार आणि नागरी हक्क चळवळींनी फर्स्ट अमेंडमेंटने प्रदान केलेले हक्क जोरदारपणे वापरले आहेत.

Declaration of Independence U.S. document of American constitution We the people with USA Flag.

१९३७ सालच्या De Jonge v. Oregon केसच्या निकालात सुप्रीम कोर्टाने हे स्पष्ट केलंय की सरकारकडे तक्रार करण्याचा नागरिकांचा हक्क सर्व सरकारी पातळींवर लागू होतो.
या अधिकाराची मुळं शोधताना इतिहासात आणखी मागे जावं लागतं. तुलनेने आधुनिक काळात अमेरिकेत मंजूर झालेल्या या अधिकाराला १२१५ सालच्या Magna Carta आणि १६८९ च्या English Bill of Rights ची पार्श्वभूमी आहे. अमेरिकेच्या स्वातंत्र्यघोषणेतही इंग्लंडच्या राजाकडे वारंवार केलेल्या तक्रारींचा उल्लेख आहे.

सामान्य लोकांना सरकारकडे, किंवा तत्कालीन सत्तेकडे आपले प्रश्न प्रभावीपणे मांडता यावेत यासाठी या तत्वाची कल्पना मांडण्यात आली होती. या तरतुदीमुळे सत्तेवर अंकुश राहील आणि जनतेच्या मतांनी निवडून आलेले नेते फक्त आपल्या हितसंबंधांचे रक्षण करणार नाहीत ही खबरदारी घेण्यासाठी हे तत्व अतिशय महत्त्वाचे आहे. कालांतराने हा हक्क प्रामुख्याने भाषणस्वातंत्र्याचा भाग बनला.

अमेरिकन्स त्यांच्या देशाला अभिमानाने ‘Land of the free’ म्हणजेच ‘स्वतंत्र लोकांचा देश’ असं म्हणतात.अमेरिकेची ही ओळख बनण्यामागे फर्स्ट अमेंडमेंडचा मोठा हात आहे.

Sharing is Caring
Write Comment
Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous Post

आरोग्य सुधारण्याचा सर्वात सोपा उपाय

Next Post

मुलांसाठी सोशल मीडिया बंद करावा का?

Photo of the week

St. Louis, Missouri, USA Skyline

सेंट लुईस हे मिसुरी राज्यातील मिसिसिपी नदीकिनारी वसलेलं एक मोठं शहर आहे. इथलं प्रसिद्ध ६३० फूट उंच Gateway Arch स्मारक १९६० च्या दशकात बांधण्यात आलं. हे स्मारक Lewis आणि Clark यांच्या १९व्या शतकाच्या सुरुवातीच्या मोहिमांना आणि अमेरिकेच्या पश्चिमेकडील विस्ताराच्या इतिहासाला समर्पित आहे.

Most Popular

चाटानुगा : नजरेआडचं सीनिक सीक्रेट 

Chattanooga, Tennessee, USA city

आकाशाला गवसणी घालणारे शहर

Skyline of Chicago, United States

कथा फर्स्ट अमेंडमेंटची

first amendment
Categories
Lifestyle
Technology
Travel
Tags
250 years of USA adventure American Chattanooga Founding Fathers fun gem hidden IndiaAmerican Indian John Admas Marathi President Travel USa USA history
You might also like
Thomas Jefferson resized
आपली अमेरिका

अमेरिकेच्या स्वातंत्र्योत्सवाची २५० वर्षं: देश घडवणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची  गोष्ट:थॉमस जेफरसन

4 Mins read
July 15, 2026

एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व, थोर विचारवंत आणि अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा व राष्ट्राचा शिल्पकार. स्वातंत्र्य,व्यक्तिस्वातंत्र्य आणि  लोकशाही या मूल्यांवर ठाम असणारे थाॅमस जेफरसन यांनी अमेरिकेच्या इतिहासावर अमिट ठसा उमटवला. त्यांनी लिहिलेल्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याने (Declaration of Independence) एका नव्या राष्ट्राचा पाया घातला. अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष, दूरदृष्टीचे नेते आणि शिक्षणाचे समर्थक म्हणून त्यांचे नाव आजही मोठ्या आदराने घेतले जाते. सुरुवातीचे …

John Adams Resized
आपली अमेरिका

अमेरिकेच्या स्वातंत्र्योत्सवाची २५० वर्षं: देश घडवणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची  गोष्ट – जॉन ॲडम्स

3 Mins read
July 4, 2026

 २०२६ या वर्षात, अमेरिकेला स्वातंत्र्य मिळून २५० वर्षं झाली. हा प्रसंग साजरा करत असताना अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या शिल्पकारांचं स्मरण करणं अगत्याचं ठरतं. ज्या थोर स्त्री पुरुषांनी स्वतंत्र अमेरिकेच्या उभारणीत आपलं लक्षणीय योगदान दिलं अशा नेत्यांच्या, विचारवंतांच्या, सुधारकांच्या, संशोधकांच्या आणि द्रष्ट्यांच्या कथा आपण या विशेष लेखमालेतून जाणून घेणार आहोत.  अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा विचार करताना सर्वप्रथम उल्लेख करायला हवा …

Skyline of Chicago, United States
आपली अमेरिका

आकाशाला गवसणी घालणारे शहर

5 Mins read
May 24, 2026

शिकागोची गगनचुंबी कहाणी गगनचुंबी इमारतींचा इतिहास म्हणजे आधुनिक शहरांच्या विकासाचीच कहाणी आहे. हजारो वर्षांपासून जगात उंच बांधकामे होती — जसे इजिप्तचे पिरॅमिड किंवा युरोपमधील प्राचीन चर्च — पण आधुनिक अर्थाने “स्कायस्क्रॅपर” म्हणजेच गगनचुंबी इमारतींची सुरुवात १९व्या शतकाच्या शेवटी Chicago येथे झाली. १८७१ मध्ये शिकागोमध्ये मोठी आग लागून शहराचा मोठा भाग नष्ट झाला. शहर पुन्हा उभे …

© 2026 | American Marathi
Logo
  • About
  • Contact
  • Stories
  • आपली अमेरिका
  • कम्युनिटी
  • टेक्नोलॉजी
  • ट्रॅव्हल
  • लाईफ
  • कल्चर
Logo
  • About
  • Contact
  • Stories
  • आपली अमेरिका
  • कम्युनिटी
  • टेक्नोलॉजी
  • ट्रॅव्हल
  • लाईफ
  • कल्चर

Rohit Kulkarni

Founder,American Marathi

Hi,this is a dummy bio and can be replaced. Thank you!

अमेरिकेच्या स्वातंत्र्योत्सवाची २५० वर्षं: देश घडवणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची  गोष्ट:थॉमस जेफरसन

 हायस्कुलमधल्या विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा 

तांत्रिक क्रांतीची दोन रूपं – भारतातला UPI आणि अमेरिकेतला AI