• About
  • Contact
  • Stories
  • आपली अमेरिका
  • कम्युनिटी
  • टेक्नोलॉजी
  • ट्रॅव्हल
  • लाईफ
  • कल्चर
Logo
  • About
  • Contact
  • Stories
  • आपली अमेरिका
  • कम्युनिटी
  • टेक्नोलॉजी
  • ट्रॅव्हल
  • लाईफ
  • कल्चर
Logo
Logo
लाईफ

 हायस्कुलमधल्या विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा 

3 Mins read
Ved Ranade
Side view of young Caucasian businesswoman in headset giving presentation in the auditorium

लेखक: वेद रानडे

वेद कॅटी, टेक्सास येथील हायस्कूलमधील  विद्यार्थी

आपल्या अंगी असणाऱ्या काही सर्वात महत्त्वाच्या कौशल्यांपैकी एक म्हणजे प्रभावीपणे संवाद साधण्याची क्षमता असं आजच्या जगात मानलं जातं. आपण जाणता अजाणता दररोजच संवाद साधत असतो भलेही तो शाब्दिक असो वा नसो. शाळेतल्या वरच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना या वयात आपल्यामध्ये नवीन कौशल्य विकसित करता येतात आणि भविष्यात उच्च शिक्षण घेताना, कामाच्या ठिकाणी, एवढंच काय तर रोजच्या आयुष्यातही त्याचा फायदा होतो. वक्तृत्व आणि वादविवाद करण्याने अशा विद्यार्थ्यांमध्ये संवाद कौशल्य विकसित करणं आणि आत्मविश्वास वृद्धिंगत करणं शक्य होतं. वक्तृत्व आणि वादविवाद या कृती केवळ शालेय जीवनातल्या चार वर्षांमध्ये करण्याच्या नव्हेत. ही तर विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याची मुहूर्तमेढ आहे.अमेरिकेत वक्तृत्व आणि वादविवादाचे अर्थात  स्पीच अँड डिबेटचे नियमन नॅशनल स्पीच अँड डिबेट असोसिएशन (NSDA) ही संस्था करते. ही देशातील सर्वात मोठी शालेय स्पीच आणि डिबेट संस्था असून तिचे १,४०,००० हून अधिक हायस्कूल आणि मिडल स्कूलचे विद्यार्थी सदस्य आहेत.

या संस्थेच्या नावात जरी स्पीच अँड डिबेट असा एकत्रित उल्लेख केलेला असला तरी स्पीच आणि डिबेट यांत फरक आहे. स्पीचमध्ये सादरीकरण, कथाकथन आणि प्रभावीपणे बोलण्यावर भर असतो. काही स्पर्धा सार्वजनिक वक्तृत्वावर आधारित असतात, तर काही नाट्यप्रयोगासारख्या असतात. डिबेटमध्ये मात्र विशिष्ट विषयावर युक्तिवाद करणे, पुरावे सादर करणे आणि विरोधी  पक्षाच्या मुद्द्यांना उत्तर देणे आवश्यक असते.

वक्तृत्वाचे अथवा भाषणांचे काही लोकप्रिय प्रकार

एक्सटेम्पोरॅनियस स्पीकिंग अथवा उत्स्फूर्त भाषण-

स्पर्धकांना  राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित तीन प्रश्न दिले जातात. भाषणाची तयारी करण्यासाठी त्यांना ३० मिनिटं दिली जातात.  त्या अवधीत आपण निवडलेल्या विषयावर लिहून किंवा पाठांतर करून परीक्षकांसमोर साडेसात मिनिटांमध्ये भाषण द्यायचं असतं.

इन्फॉर्मेटिव्ह स्पीकिंग अथवा माहितीपूर्ण भाषण-

या प्रकारात विद्यार्थी स्वतःच्या पसंतीचा विषय निवडतात आणि त्या विषयावर भाषण देतात. या भाषणात विनोद, गोष्टी, चित्रफलक किंवा इतर सर्जनशील पद्धतीचा वापर करून ते  जास्तीत जास्त  माहितीपूर्ण करणं अपेक्षित असतं. यासाठी दहा मिनिटांची कालमर्यादा असते.

ओरिजिनल ऑरेटरी अथवा विचारप्रवर्तक भाषण- 

हा प्रकार जरी माहितीपूर्ण भाषणासारखा वाटत असला तरी यात केवळ एखाद्या विषयाची माहिती देणं पुरेसं नसतं. स्पर्धकांनी एखादा नवीनच विषय अथवा विचार मांडून तो विषय अथवा विचार परीक्षकांना आणि प्रेक्षकांना पटवून द्यायचा असतो.

इंटरप्रिटेशन अथवा सादरीकरण-

या प्रकारात नाट्यमय (Dramatic) आणि विनोदी (Humorous) असे दोन विभाग असतात. स्पर्धक एखाद्या प्रसिद्ध नाटक, कादंबरी किंवा साहित्यकृतीतला एखादा प्रसंग सादर करतात. ड्युओ इंटरप्रिटेशनमध्ये सादरीकरण दोघांनी मिळून करायचं असतं मात्र त्यांनी एकमेकांशी नजरेने किंवा इतर प्रकारे संपर्क साधायचा नसतो.

वादविवादाचे काही प्रमुख प्रकार

काँग्रेसनल डिबेट (Congressional Debate)- उच्च माध्यमिक विद्यालयीन आंतरशालेय वादविवाद स्पर्धा

या स्पर्धेत विद्यार्थी अमेरिकन काँग्रेस सदस्यांची भूमिका साकारतात. काल्पनिक विधेयके आणि ठरावांवर चर्चा केली जाते. प्रत्येक भाषणाची वेळ तीन मिनिटांची असते.

वर्ल्ड स्कूल्स डिबेट (World Schools Debate)

या प्रकारात एका संघात तीन ते पाच विद्यार्थी असतात. प्रत्येक सदस्याची विशिष्ट भूमिका असते. संघ सुसूत्रपणे युक्तिवाद तयार करून विरोधी संघाशी चर्चा करतो. यासाठी त्यांना जास्तीत जास्त आठ मिनिटांचा अवधी दिलेला असतो तर प्रतिस्पर्धी संघाला उत्तर देण्यासाठी जास्तीत जास्त चार मिनिटं दिलेली असतात आणि हे उत्तर देण्याची परवानगी केवळ पहिल्या किंवा दुसऱ्या वादविवादपटूलाच असते.

लिंकन-डग्लस आणि पब्लिक फोरम डिबेट (LD/PF)

लिंकन-डग्लस डिबेट आणि पब्लिक फोरम डिबेट या वादविवाद प्रकारात प्रत्येक स्पर्धक वैयक्तिक पातळीवर एकमेकांसमोर वादविवादासाठी उभा ठाकतो. लिंकन-डग्लस डिबेट प्रकारामध्ये त्यांच्यात नैतिकता, करुणा यांसारख्या मूल्यांवर चर्चा घडते तर पब्लिक फोरम डिबेटमध्ये त्यांच्यात दिलेल्या विषयावर वादविवाद होतो. शेवटचा स्पर्धा प्रकार म्हणजे स्विंग स्पर्धा. या दोन स्पर्धांचं आयोजन एकाच ठिकाणी म्हणजे एकाच शाळेत किंवा संस्थेत सलग दोन ते तीन दिवस केलेलं असतं. स्पीच आणि डिबेटचा – अर्थात वक्तृत्व आणि वादविवादाचा प्रत्येक प्रकार विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळी कौशल्यं विकसित करतो. उदाहरणार्थ, उत्स्फूर्त भाषण हा सार्वजनिक वक्तृत्वाचा सर्वात थेट प्रकार मानला जातो तर अनेक विद्यार्थ्यांना डिबेटची – वादविवादात्मक शैली भावते.  एरवी एकमेकांना कधीही भेटली नसती अशी लोकं या स्पर्धांच्या निमित्ताने एकमेकांना भेटतात, त्यांच्या विचारांची देवाण घेवाण होते. स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांशी मैत्री करण्याची संधी मिळते हा  या उपक्रमातला सर्वात आनंददायी भाग असतो. अनेकांसाठी ही मोठ्या प्रमाणावर ओळखी करून घेण्याची पहिली संधी असते.माझ्या शाळेत स्पीच आणि डिबेटचा हंगाम साधारणपणे ऑगस्टपासून एप्रिलपर्यंत चालतो. यातल्या किती स्पर्धांमध्ये आपण सहभागी व्हायचं हे विद्यार्थी स्वतः ठरवू शकतात. यावर्षी मी एकूण १७ स्पर्धांमध्ये भाग घेतला.  त्यापैकी ६ स्पर्धा ऑनलाइन होत्या,  १ राज्यस्तरीय, १ जिल्हास्तरीय, ७ ह्युस्टनमधल्या आंतरशालेय तर १ हार्वर्ड तर उर्वरित १ येल विद्यापीठात आयोजित केलेली होती.

या स्पर्धांमुळे मला नवीन शहरं, महाविद्यालयं पाहण्याची संधी तर मिळालीच,  पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे आव्हानांना सामोरं जाण्याची तयारी झाली. हार – जीत हा प्रत्येक स्पर्धेचा भाग असतो. या प्रक्रियेतून विद्यार्थी अपयशावर मात करायला शिकतात.

ज्या विद्यार्थ्यांना या स्पीच आणि डिबेट स्पर्धांबद्दल सविस्तर माहिती हवी असेल त्यांनी ती NSDA च्या व्हिडिओ, लेख आणि तत्सम स्रोतांचा वापर करून मोफत मिळवावी. इंटरनेटमुळे जगभरातून प्रश्न करता येत असल्याकारणाने उत्स्फूर्त भाषणं विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत. माझ्या मते, हायस्कूलमध्ये असतानाच्या मर्यादित काळात विद्यार्थ्यांनी शक्य तितके नवीन आणि वेगवेगळे अनुभव घ्यायला हवेत. आपल्याला नक्की काय आवडतं याचा शोध घेण्यासाठी आणि स्वतःला घडवण्यासाठी स्पीच आणि डिबेट स्पर्धा हा एक उत्कृष्ट मार्ग आहे.

Sharing is Caring
Write Comment
Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous Post

तांत्रिक क्रांतीची दोन रूपं – भारतातला UPI आणि अमेरिकेतला AI 

Next Post

अमेरिकेच्या स्वातंत्र्योत्सवाची २५० वर्षं: देश घडवणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची  गोष्ट:थॉमस जेफरसन

Photo of the week

St. Louis, Missouri, USA Skyline

सेंट लुईस हे मिसुरी राज्यातील मिसिसिपी नदीकिनारी वसलेलं एक मोठं शहर आहे. इथलं प्रसिद्ध ६३० फूट उंच Gateway Arch स्मारक १९६० च्या दशकात बांधण्यात आलं. हे स्मारक Lewis आणि Clark यांच्या १९व्या शतकाच्या सुरुवातीच्या मोहिमांना आणि अमेरिकेच्या पश्चिमेकडील विस्ताराच्या इतिहासाला समर्पित आहे.

Most Popular

चाटानुगा : नजरेआडचं सीनिक सीक्रेट 

Chattanooga, Tennessee, USA city

आकाशाला गवसणी घालणारे शहर

Skyline of Chicago, United States

कथा फर्स्ट अमेंडमेंटची

first amendment
Categories
Lifestyle
Technology
Travel
Tags
250 years of USA adventure American Chattanooga Founding Fathers fun gem hidden IndiaAmerican Indian John Admas Marathi President Travel USa USA history
You might also like
Thomas Jefferson resized
आपली अमेरिका

अमेरिकेच्या स्वातंत्र्योत्सवाची २५० वर्षं: देश घडवणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची  गोष्ट:थॉमस जेफरसन

4 Mins read
July 15, 2026

एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व, थोर विचारवंत आणि अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा व राष्ट्राचा शिल्पकार. स्वातंत्र्य,व्यक्तिस्वातंत्र्य आणि  लोकशाही या मूल्यांवर ठाम असणारे थाॅमस जेफरसन यांनी अमेरिकेच्या इतिहासावर अमिट ठसा उमटवला. त्यांनी लिहिलेल्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याने (Declaration of Independence) एका नव्या राष्ट्राचा पाया घातला. अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष, दूरदृष्टीचे नेते आणि शिक्षणाचे समर्थक म्हणून त्यांचे नाव आजही मोठ्या आदराने घेतले जाते. सुरुवातीचे …

Close up of man using smart phone while paying to a waiter in a cafe.
टेक्नोलॉजी

तांत्रिक क्रांतीची दोन रूपं – भारतातला UPI आणि अमेरिकेतला AI 

4 Mins read
July 10, 2026

लेखक: विनायक काळे भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये सतत प्रवास करणाऱ्या कोणालाही एक गोष्ट लगेच जाणवते. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), क्लाउड कॉम्प्युटिंग आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये अमेरिका जगात आघाडीवर असली, तरी रोजच्या व्यवहारांमध्ये भारत अनेक बाबतीत कितीतरी पुढे असल्याचं दिसतं. पुणे, मुंबईसारख्या एखाद्या मोठया शहरातल्या किंवा एखाद्या छोट्या शहरातल्या हमरस्त्यावरून जर गेलात, तर तुमच्या लक्षात येईल की …

Image taken from:https://www.odysseymovie.com/gallery/
कल्चर

ख्रिस्तोफर नोलन : आधुनिक चित्रपटसृष्टीला नवी दिशा देणारा दिग्दर्शक

3 Mins read
July 10, 2026

२०२६ मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या हॉलीवूड चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘द ओडिसी‘ (The Odyssey). ऑस्कर विजेते दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन यांचा हा नवा चित्रपट ग्रीक कवी होमर यांच्या प्रसिद्ध महाकाव्यावर आधारित आहे. ही कथा आहे ओडिसियस या ग्रीक योद्ध्याची. ट्रोजन युद्ध संपल्यानंतर आपल्या घरी परतण्यासाठी तो दहा वर्षांचा कठीण आणि थरारक प्रवास करतो. या प्रवासात त्याला अनेक …

© 2026 | American Marathi
Logo
  • About
  • Contact
  • Stories
  • आपली अमेरिका
  • कम्युनिटी
  • टेक्नोलॉजी
  • ट्रॅव्हल
  • लाईफ
  • कल्चर
Logo
  • About
  • Contact
  • Stories
  • आपली अमेरिका
  • कम्युनिटी
  • टेक्नोलॉजी
  • ट्रॅव्हल
  • लाईफ
  • कल्चर

Rohit Kulkarni

Founder,American Marathi

Hi,this is a dummy bio and can be replaced. Thank you!

अमेरिकेच्या स्वातंत्र्योत्सवाची २५० वर्षं: देश घडवणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची  गोष्ट:थॉमस जेफरसन

तांत्रिक क्रांतीची दोन रूपं – भारतातला UPI आणि अमेरिकेतला AI 

ख्रिस्तोफर नोलन : आधुनिक चित्रपटसृष्टीला नवी दिशा देणारा दिग्दर्शक