फेमस शहरांच्या बाबतीत एक गोष्ट असते, ती म्हणजे या शहरांची पब्लिसिटी जोरदार होत राहते. मग ती पॅरिस आणि लंडनसारखी ‘मेनस्ट्रीम’ शहरं असतील किंवा सांतोरिनीसारखी तुलनेने आॅफबीट डेस्टिनेशन्स, त्यांची चर्चा ट्रॅव्हलर ग्रुप्समध्ये किंवा मीडियामध्ये तर नक्कीच सुरू राहते.
आणि काही शहरे अशी असतात जी हळूहळू मनात घर करतात. Chattanooga हे असेच एक शहर आहे. चॅटनुगासारखी काही लोकेशन्स शांतपणे आपापलं वैशिष्ट्य जपत राहतात. यासारखी ठिकाणं अंगावर येत तुम्हाला बोलवत नाहीत आणि जेव्हा अशी हिडन जेम्स तुम्हाला फायनली सापडतात तेव्हा ती नव्या डिस्कव्हरीचा आनंद देतात.
टेनेसी राज्यातील डोंगररांगा आणि टेनेसी नदीच्या वळणांमध्ये वसलेले चाटानुगा हे अमेरिकेतील सर्वात सुंदर पण तुलनेने कमी चर्चिलेले शहर मानले जाते. इथे धबधबे डोंगरांच्या आत लपलेले आहेत, जुनी रेल्वे जवळजवळ सरळ उंच चढते, लोक सकाळी डोंगरांवर ट्रेकिंग करतात आणि संध्याकाळी नदीकाठी बसून संगीत ऐकतात.
अमेरिकेतील प्रसिद्ध Great Smoky Mountains National Park कडे जाणारे अनेक पर्यटक चाटानुगाकडे दुर्लक्ष करतात. पण जे लोक इथे थांबतात त्यांना पटकन समजते — हे केवळ वाटेतले शहर नाही; हे स्वतःमध्ये एक खास अनुभव आहे.
“Scenic City” या नावाने ओळखले जाणारे चाटानुगा म्हणजे निसर्ग, साहस, संगीत, इतिहास आणि दक्षिण अमेरिकेतील निवांत जीवनशैली यांचे सुंदर मिश्रण आहे.
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे — इथे अजूनही मोठी गर्दी नाही.

इतिहास : डोंगर, रेल्वे, चॅटनुगा
टूरिस्ट मॅपवर येण्याच्या कितीतरी आधीपासून या शहराला महत्त्व होते. नेटिव्ह अमेरिकन्सच्या व्यापारी मार्गांवरचं हे एक महत्त्वाचं ठिकाण होतं. नंतर अमेरिकन सिव्हिल वाॅरदरम्यान एक स्ट्रॅटेजिक रेलरोड सिटी म्हणून चॅटनुगाला ओळख मिळाली.
या शहराच्या लोकेशनमुळे ज्याचा इथे कब्जा, त्याच्या हातात अमेरिकन साऊथमधले सगळे रेलरोड्स,अशी परिस्थिती होती. त्यामुळे सिव्हिल वाॅरमधल्या अनेक लढाया या परिसरात झाल्या. इथल्या डोंगर आणि रेल्वेमार्गांना मोठा इतिहास आहे. आणि त्याची जाणीव सतत होत राहते.
पण फक्त नाॅस्टॅल्जिक इतिहासावर चॅटनुगाची ओळख अवलंबून नाहीये. या शहराने स्वत:ला रिइन्व्हेंट केलं आहे.
विसाव्या शतकात चॅटनुगामध्ये कारखान्यांमुळे प्रचंड प्रदूषण झालं. १९६९ साली तर हे शहर अमेरिकेतली सगळ्यात पोल्युटेड सिटी म्हणवलं गेलं.
हे झाल्यावर मात्र इथल्या लोकांनी कंबर कसली. पुढच्या काही दशकात या शहराने जोरकसपणे प्रदूषण कमी करायला पावलं उचलली. नदीकिनारा विकसित केला. एेतिहासिक स्थळांचे रिस्टोरेशन झालं आणि आऊटडोर टूरिझमला चालना मिळाली.
आज चॅटनुगा अमेरिकेतल्या बेस्ट आऊटडोअर सिटीजपैकी एक आहे! कलाकार, रिमोट वर्कर्स, उद्योजक, अॅडव्हेंचरर्स अशा सगळ्यांना इथे जावंसं वाटतं.
चॅटनुगा वाईब
ही प्रत्यक्ष अनुभवण्याची गोष्ट आहे. इकडे एकाचवेळी एनर्जेटिक आणि रिलॅक्स्ड वाटतं!
इथे एका कोपऱ्यात राॅक क्लाईंबर्स त्यांच्या माऊंटन बाईक्स गाड्यांमध्ये चढवताना दिसतात. दुसरीकडे टेनेसी नदीवरच्या चमकत्या ब्रिजेसजवळ कपल्स शांतपणे फेरफटका मारत असतात. रूफटाॅप बार्समधून लाईव्ह म्युझिकचा आवाज एेकू येतो. डायनर्समध्ये लोक बिस्किट आणि ग्रेव्हीचा आस्वाद घेत असतात आणि त्याचवेळी ट्रेंडी कॅफेज् पसंत असणारा क्राऊडही मस्तपैकी काॅफी पीत असतो.
जुन्या वेअरहाऊसेसमध्ये आता आर्ट गॅलरीज् बनल्या आहेत. काही ठिकाणी व्हिस्की बार आहेत तर काही ठिकाणी कोवर्किंग स्पेसेस आहेत.
चॅटनुगा आपल्याच तालात मस्त असतं.
इकडे जगण्यासाठी जिवाच्या आकांताने केलेला संघर्ष बिलकुल दिसत नाही. इथले लोक कामाला जाण्याआधी कायॅकिंग करतात. लंचनंतर हायकिंगला जातात. वीकएंडला डोंगर चढतात किंवा जवळची जंगलं धुंडाळतात.
आऊटडोअर लाईफ हा काही वेगळा प्रकार नाहीये इथे. तो इथल्या सगळ्या जगण्यामध्ये हलकेच मिसळलाय. संस्कृतीचाच भाग आहे तो.
इकडचं स्पिरिट चॅटनुगाला एक माॅडर्न अॅपलेचियन पर्सनॅलिटी देतं…रांगडी, कलात्मक, इंडिपेंडंट आणि निसर्गाशी कनेक्टेड.
चॅटनुगाचा लूकआऊट माऊंटन
लूकआऊट माऊंटन संपूर्ण चॅटनुगावर नजर ठेवतो. हा फक्त एक डोंगर नाहीये. या शहराचं त्याच्याशी अगदी जवळचं भावनिक नातं आहे.
या डोंगरावर गेलात की तुमच्या नजरेत एकाच वेळी अनेक राज्यांचा भूभाग येतो. सनराईझ आणि सनसेटला डोंगरांचे निळेशार कडे दूर क्षितिजापर्यंत दिसत राहतात. लूकआऊट माउंटन फक्त एक रँडम देखावा नाहीये. चॅटनुगाची अनेक प्रसिध्द ठिकाणं या डोंगरावर आहेत.

रूबी फाॅल्स: पृथ्वीच्या पोटातला धबधबा
लूकआऊट माउंटनमध्ये एक विलक्षण प्रकार पाहायला मिळतो. रूबी फाॅल्स. हा एक अंडरग्राऊंड धबधबा आहे जो एका केव्ह सिस्टिममध्ये आहे.
हा धबधबा पाहायला गुहांच्या नेटवर्कमधून खाली जावं लागतं. मग हळूहळू ऐकू येतो या धबधब्याचा जबरदस्त घुमणारा आवाज. आणि शेवटी दिसतो गुहेच्या आतला हा १४५ फुटांचा चमकता धबधबा!
हा अनुभव अफलातून आहे. हा नैसर्गिक धबधबा आहे. पण तो एक फँटसी फिल्मचा सेटच वाटतो.
द इन्क्लाईन रेल्वे
लूकआऊट माऊंटन आणि रूबी फाॅल्सनंतर लगेच तिसरा नंबर लागतो तो लूकआऊट माऊंटन इन्क्लाईन रेल्वेचा. ही रेल्वे लूकआऊट माऊंटन चढते आणि काही ठिकाणी हा स्लोप एवढा भयानक आहे की ती अमेरिकेत असा डोंगरकडा, एवढा उतार चढणारी एकच प्रवासी रेल्वे मानली जाते. एवढा तीव्र उतार सर करणारी दुसरी कोणतीच पॅसेंजर ट्रेन अमेरिकेत नाही.
या डोंगरकड्याचा स्लोप काही ठिकाणी एवढा तीव्र आहे की प्रवाशांना वाटतं की ट्रेन पूर्णच व्हर्टिकल झाली आहे. हा रेल्वे रूट एकोणिसाव्या शतकात सुरू झाला. आज याकडे त्याकाळच्या इंजिनियरिंगचा उत्कृष्ट नमुना म्हणून पाहिलं जातं. आजच्या काळात हा एक फन एक्सपिरिअन्सपण झाला आहे. ही ट्रेनराईड घेत असताना चॅटनुगा आणि आसपासच्या डोंगरांची मस्त सीनरी पाहायला मिळते.
आऊटडोअर्स विदाऊट रश
स्मोकी माऊंटनला जाणारे खूप आहेत. अमेरिकेतल्या नॅशनल पार्क्समध्ये प्रचंड गर्दी असते. चॅटनुगा इथेच युनिक ठरतं. इकडे आऊटडोअर अॅडव्हेंचरचे खूप पर्याय आहेत आणि गर्दी नाही. त्यामुळे हा अनुभव खरंच वेगळा ठरतो.
जस्ट चेक, डाऊनटाऊनपासून फक्त काही मिनिटांच्या अंतरावर तुम्ही,
- फाॅरेस्ट ट्रेलवर जाऊ शकता
- राॅक क्लाईंबिंग करू शकता
- टेनेसी रिव्हरमध्ये कायॅकिंग करू शकता
- माऊंटन बाईकिंग करू शकता
- गुहा, धबधबे पाहू शकता
याशिवाय सनराईज् पॅडलबोर्डिंग आणि नाईट कँपिंगसुध्दा सहज शक्य आहे. खूप कमी काळात या शहराची ओळख अमेरिकेतल्या टाॅप क्लाईंबिंग डेस्टिनेशन्सपैकी एक झाली आहे.
टेनेसी रिव्हरवाॅक नदीच्या किनाऱ्याने कितीतरी मैलावर पसरलेला आहे. हा एक मस्त अर्बन ग्रीनवे आहे.
सरप्रायझिंग फूड सीन
चॅटनुगा छोटं शहर आहे. पण त्यामानाने इथला फूड सीन जबरदस्त आहे. अमेरिकन साऊथच्या ट्रॅडिशन्स आणि यंगर जनरेशनने केलेले नवीन प्रयोग यामुळे हे झालंय.
क्लासिक बार्बेक्यू, फ्राईड कॅटफिश, सदर्न बिस्किट्स, Meat-and-three diners अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला चॅटनुगामध्ये सापडतीलच. पण याशिवाय इथे craft breweries, फार्म-टू-टेबल रेस्टाॅरंट्स, गाॅर्मे बर्गर्स, elevated Appalachian cuisine, आर्टिझान बेकरीज् आणि काॅफी रोस्टर्सही मिळतील.
चॅटनुगाचा फील म्हणजे नॅशव्हिलपेक्षा कमी पाॅलिश्ड आणि अॅशव्हिलपेक्षा कमी कमर्शिअलाईज्ड असा आहे. आणि यातच या शहराच्या चार्मचं सीक्रेट आहे.
चॅटनुगाला इतकं खास बनवतं तरी काय?
अमेरिकन ट्रॅव्हल एक्स्पीरिअन्समध्ये दिवसेंदिवस एक गोष्ट कमी होत जातेय.
आॅथेंटिसिटी.
चॅटनुगामध्ये तुम्हाला वर्ल्ड-क्लास सीनरी मिळेल. आणि इथे ओव्हरटूरिझम दिसणार नाही. इथल्या अॅडव्हेंचर्समध्ये दिखाऊपणा नाहीये. जेन्युईन कल्चरचं बाजारीकरण नाही झालंय इथे.
इथे तुम्ही एका प्रसन्न सकाळी माऊंटन हायकिंग करू शकता. दुपारी अंडरग्राऊंड गुहा बघू शकता. आणि संध्याकाळी ब्लूज् म्युझिकचा लाईव्ह आस्वाद लोकल क्राफ्ट बीअर पिता पिता घेऊ शकता. आणि हे सगळं करूनही हे शहर तुम्हाला पुन्हापुन्हा सरप्राईज नक्कीच करू शकतं.
सोशल मीडियाच्या ओव्हर-एक्सपोझरमध्ये कितीतरी टूरिस्ट डेस्टिनेशन्स वाहून गेली आहेत. असं वातावरण सगळीकडे असताना चॅटनुगा तुम्हाला नव्या डिस्कव्हरीचा आनंद देईल. तुम्हाला वाटत राहील की हे ठिकाण आणखी फेमस का नाहीये अजून.
पण चॅटनुगासारखी डेस्टिनेशन्स कमी फेमस असण्यातच खरी मजा आहे नाही का?



