• About
  • Contact
  • Stories
  • आपली अमेरिका
  • कम्युनिटी
  • टेक्नोलॉजी
  • ट्रॅव्हल
  • लाईफ
  • कल्चर
Logo
  • About
  • Contact
  • Stories
  • आपली अमेरिका
  • कम्युनिटी
  • टेक्नोलॉजी
  • ट्रॅव्हल
  • लाईफ
  • कल्चर
Logo
Logo
टेक्नोलॉजी

गुगलचे नवे AI सर्च फीचर:माहिती शोधण्याचा स्मार्ट मार्ग की मुलांसाठी नवा धोका ?

4 Mins read
American Marathi
Woman searching on a website

गेली दोन दशके एखादी माहिती शोधायची असेल, तर सर्वसाधारणपणे एकच सल्ला दिला जायचा—”गुगलवर शोधा.”
मग तो विद्यार्थ्यांचा अभ्यास असो, आरोग्यविषयक माहिती असो किंवा प्रवासाचे नियोजन, गुगल सर्चची पद्धत एकदम सोपी होती. तुम्ही प्रश्न टाकायचा आणि गुगल तुम्हाला विविध वेबसाइट्सची यादी दाखवायचे. हो पण त्यानंतर, कोणती माहिती विश्वासार्ह आहे हे ठरवण्याची जबाबदारी केवळ वापरकर्त्यावर असे.

मात्र आता ही पद्धत वेगाने बदलत आहे. गुगलने AI Overview आणि AI Mode ही दोन नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित फीचर्स सुरू केली आहेत. ही फीचर्स केवळ वेबसाइट्सच्या लिंक दाखवत नाहीत, तर विविध विषयांवरील माहितीचा सारांश तयार करून थेट उत्तर देतात. एवढेच नाही, तर वापरकर्ता त्या उत्तरावर पुढे प्रश्न विचारत संवादही साधू शकतो. ही सुविधा नक्कीच वेळ वाचवते. पण अलीकडेच Common Sense Media च्या Youth AI Safety Institute ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात आणि PBS NewsHour ने केलेल्या वृत्तांकनात नव्या AI सर्चमुळे मुलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

AI Overview आणि AI Mode म्हणजे काय?
AI Overview हे फीचर तुम्ही गुगलवर शोधताच सर्वात वर दिसते. अनेक वेबसाइट्स उघडण्याऐवजी AI स्वतः विविध स्रोतांतील माहितीचा सारांश तयार करून थेट उत्तर देते. AI Mode हे यापेक्षा आणखी पुढचे पाऊल आहे. हे फीचर ChatGPT सारखे काम करते. तुम्ही पहिल्या उत्तरावर आधारित पुढचे प्रश्न विचारू शकता, फोटो किंवा दस्तऐवज अपलोड करू शकता आणि AI सोबत संवादही सुरू ठेवू शकता. यामुळे माहिती शोधणे अधिक सोपे आणि जलद झाले आहे. पण यामुळे लोक अनेकदा मूळ वेबसाइट्स उघडण्याऐवजी AI ने दिलेले उत्तरच अंतिम मानू लागतात.

तज्ज्ञांची चिंता का वाढली आहे?

Common Sense Media च्या Youth AI Safety Institute ने ११ आणि १५ वर्षांच्या मुलांच्या खात्यांचा वापर करून गुगलच्या AI Search ची चाचणी केली. SafeSearch सुरू असतानाही संशोधकांनी मुलं प्रत्यक्षात विचारू शकतील असे २,६०० हून अधिक प्रश्न AI ला विचारले.
या चाचणीनंतर संस्थेने गुगलच्या AI Search ला मुलांसाठी “Unacceptable Risk” (अस्वीकार्य धोका) असे रेटिंग दिले.

या अहवालात AI पूर्णपणे बंद करण्याची मागणी करण्यात आलेली नाही. मात्र, AI Search हे आता गुगलमध्येच समाविष्ट असल्याने पालक आणि शाळांना ते सहज बंद करता येत नाही, ही मोठी चिंता असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

मानसिक आरोग्य :
मानसिक आरोग्याविषयीची चिंता या अहवालातील सर्वात गंभीर मुद्दा आहे आणि तो म्हणजे मानसिक आरोग्याशी संबंधित प्रश्न आणि त्याची उत्तरे. इथे काही प्रसंगी AI ला मुलांमध्ये नैराश्य, आत्महत्येचे विचार किंवा खाण्याच्या विकारांची लक्षणे ही ओळखता आली नाहीत. काही उत्तरांमध्ये AI ने चुकीची किंवा कालबाह्य माहिती दिली. काही वेळा तर मदतीसाठी अशा हेल्पलाइनचा उल्लेख करण्यात आला, जी आता अस्तित्वातच नाहीत तज्ज्ञांचे मत आहे की, अशा संवेदनशील परिस्थितीत AI ने नेहमी विश्वासार्ह आणि अद्ययावत मानसिक आरोग्य सेवा किंवा हेल्पलाइनची माहिती द्यायला हवी.

विद्यार्थ्यांचा अभ्यास कोण करणार?
या अहवालात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे की संशोधकांनी दिलेल्या सर्व गृहपाठाच्या प्रश्नांची AI Mode ने पूर्ण आणि तयार उत्तरे दिली.
AI अभ्यास समजून घेण्यासाठी उपयोगी ठरू शकते. पण जर विद्यार्थ्यांना विचार न करता तयार उत्तरे मिळू लागली, तर त्यांची चिकित्सक विचारशक्ती (Critical Thinking) आणि समस्या सोडवण्याची क्षमता कमी होऊ शकते, अशी शिक्षणतज्ज्ञांची चिंता आहे. विशेष म्हणजे अनेक शाळांमध्ये वापरल्या जाणाऱ्या संगणकांवरही AI Search उपलब्ध असल्याने शिक्षकांना त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण जात आहे.

AI वर किती विश्वास ठेवावा?

AI चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एकाच प्रश्नाचे उत्तर प्रत्येक वेळी सारखेच असेल, याची खात्री नसते. अहवालानुसार, इतिहासासारख्या विषयांवरील एकाच प्रश्नाला AI ने वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी उत्तरे दिली. याशिवाय काही उत्तरांमध्ये सोशल मीडिया पोस्ट किंवा ऑनलाइन चर्चा मंचांवरील माहितीचाही संदर्भ देण्यात आला होता. त्यामुळेच वापरकर्त्याला कोणती माहिती तज्ज्ञांकडून आली आहे आणि कोणती इंटरनेटवरील साध्या चर्चेतून आली आहे, हे समजणे कठीण जाऊ शकते. पारंपरिक गुगल सर्चमध्ये अनेक वेबसाइट्स पाहून तुलना करता येते. पण AI Overview मध्ये एकच उत्तर दिसत असल्यामुळे तेच अंतिम आणि अचूक आहे, असा गैरसमज होण्याची शक्यता असते.

हा प्रश्न ChatGPT पेक्षा वेगळा का आहे?
अनेकांना वाटते की ChatGPT किंवा इतर AI चॅटबॉट वापरणे हा वैयक्तिक निर्णय असतो. पण गुगलचे AI Search वेगळे आहे. कारण ते थेट गुगल सर्चमध्येच समाविष्ट करण्यात आले आहे. म्हणजे माहिती शोधण्यासाठी गुगल वापरणाऱ्या लाखो मुलांना AI ने तयार केलेली उत्तरे आपोआप दिसू शकतात.
Common Sense Media च्या मते, ९ ते १७ वर्षे वयोगटातील सुमारे ७५ टक्के मुलांनी AI आधारित सर्चचा वापर केला आहे किंवा त्यांना AI Overview दिसले आहे.

गुगलचे म्हणणे काय?

गुगलने या अहवालातील काही निष्कर्षांशी असहमती दर्शवली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की संशोधकांनी विचारलेले अनेक प्रश्न हे दैनंदिन वापरातील नसून कृत्रिम स्वरूपाचे होते. तसेच AI Search मध्ये अनेक सुरक्षा उपाय (Safety Guardrails) आधीपासूनच आहेत आणि वापरकर्त्यांच्या अभिप्रायानुसार त्यात सातत्याने सुधारणा केल्या जात आहेत. गुगलचे म्हणणे आहे की या नव्या AI सुविधांचा उद्देश लोकांना माहिती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करणे हा आहे.

पालक आणि शिक्षकांनी काय करावे?
Common Sense Media च्या अहवालात AI वापरण्यास विरोध करण्यात आलेला नाही. त्याऐवजी मुलांना AI चा जबाबदारीने वापर कसा करायचा हे शिकवण्यावर भर देण्यात आला आहे. AI ने दिलेले उत्तर अंतिम सत्य समजू नये. महत्त्वाची माहिती नेहमी मूळ वेबसाइटवर जाऊन तपासावी. सरकारी संस्था, विद्यापीठे, संशोधन संस्था किंवा विश्वासार्ह वृत्तसंस्था यांच्याकडील माहितीशी तुलना करावी. शाळांनीही विद्यार्थ्यांना AI चे फायदे आणि मर्यादा समजावून सांगणे गरजेचे आहे. माहिती शोधण्याच्या नव्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता माहिती शोधण्याची पद्धत कायमची बदलत आहे. AI मुळे माहिती मिळवणे अधिक जलद, सोपे आणि संवादात्मक झाले आहे. पण त्याच वेळी अचूकता, विश्वासार्हता आणि विशेषतः मुलांच्या सुरक्षिततेसारखे महत्त्वाचे प्रश्नही निर्माण झाले आहेत. प्रौढ व्यक्तींना चुकीची माहिती मिळाली, तर ती कदाचित दुरुस्त करता येईल. पण एखाद्या मुलाला आरोग्य, मानसिक ताण किंवा अभ्यासाबाबत चुकीचा सल्ला मिळाला, तर त्याचे परिणाम अधिक गंभीर होऊ शकतात.

Common Sense Media आणि PBS NewsHour यांनी उपस्थित केलेला प्रश्न फक्त गुगलपुरता मर्यादित नाही, तर भविष्यात AI आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनणार आहे. त्यामुळे सर्वांत महत्त्वाचा प्रश्न असा आहे—AI च्या सुविधांचा लाभ घेत असताना, विशेषतः मुलांसाठी ते सुरक्षित, विश्वासार्ह आणि जबाबदारीने वापरले जाईल याची खात्री आपण कशी करणार?

Sharing is Caring
Write Comment
Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous Post

अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांपैकी किती टक्के लोक मराठी बोलतात?

Photo of the week

St. Louis, Missouri, USA Skyline

सेंट लुईस हे मिसुरी राज्यातील मिसिसिपी नदीकिनारी वसलेलं एक मोठं शहर आहे. इथलं प्रसिद्ध ६३० फूट उंच Gateway Arch स्मारक १९६० च्या दशकात बांधण्यात आलं. हे स्मारक Lewis आणि Clark यांच्या १९व्या शतकाच्या सुरुवातीच्या मोहिमांना आणि अमेरिकेच्या पश्चिमेकडील विस्ताराच्या इतिहासाला समर्पित आहे.

Most Popular

चाटानुगा : नजरेआडचं सीनिक सीक्रेट 

Chattanooga, Tennessee, USA city

ख्रिस्तोफर नोलन : आधुनिक चित्रपटसृष्टीला नवी दिशा देणारा दिग्दर्शक

Image taken from:https://www.odysseymovie.com/gallery/

अमेरिकेच्या स्वातंत्र्योत्सवाची २५० वर्षं: देश घडवणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची  गोष्ट – जॉन ॲडम्स

John Adams Resized
Categories
Lifestyle
Technology
Travel
Tags
250 years of USA adventure American Chattanooga Founding Fathers fun gem hidden IndiaAmerican Indian John Admas Marathi President Travel USa USA history
You might also like
Close up of man using smart phone while paying to a waiter in a cafe.
टेक्नोलॉजी

तांत्रिक क्रांतीची दोन रूपं – भारतातला UPI आणि अमेरिकेतला AI 

4 Mins read
July 10, 2026

लेखक: विनायक काळे भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये सतत प्रवास करणाऱ्या कोणालाही एक गोष्ट लगेच जाणवते. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), क्लाउड कॉम्प्युटिंग आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये अमेरिका जगात आघाडीवर असली, तरी रोजच्या व्यवहारांमध्ये भारत अनेक बाबतीत कितीतरी पुढे असल्याचं दिसतं. पुणे, मुंबईसारख्या एखाद्या मोठया शहरातल्या किंवा एखाद्या छोट्या शहरातल्या हमरस्त्यावरून जर गेलात, तर तुमच्या लक्षात येईल की …

social media kids
टेक्नोलॉजी फिचर्ड

मुलांसाठी सोशल मीडिया बंद करावा का?

3 Mins read
April 30, 2026

काही वर्षांपूर्वीपर्यंत, मुलांच्या बालपणाबद्दलची चिंता वेगळी होती—ते बाहेर कमी खेळतात, पुस्तकं कमी वाचतात, मित्रांसोबत कमी वेळ घालवतात. आज हीच चिंता एका नव्या रूपात समोर येते: ते स्क्रीनपासून दूर राहतात का? घरातला एक साधा प्रसंग—संध्याकाळची वेळ, जेवणाची तयारी चालू आहे, आणि एका कोपऱ्यात बसलेलं मूल, डोळे फोनच्या स्क्रीनवर खिळलेले. त्याच्या बोटांचा वेग, स्क्रीनवरील बदलणारे व्हिडिओ, आणि …

WhatsApp Image 2026-08-02 at 3.27.14 PM
कम्युनिटी

अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांपैकी किती टक्के लोक मराठी बोलतात?

3 Mins read
August 2, 2026

न्यू जर्सीतील एडिसन, कॅलिफोर्नियातील फ्रेमाँट, टेक्सासमधील शुगर लँड किंवा इलिनॉयमधील नेपरव्हिलसारख्या शहरांतील भारतीय वसाहतीतून फेरफटका मारला, तर भारताची भाषेची  वैविधता अमेरिकेतही जिवंत असल्याचा अनुभव येतो. उदाहरणार्थ  : किराणा मालाच्या दुकानात एखादे कुटुंब गुजरातीमध्ये बोलत असते.  तर काही मित्र तेलुगू आणि इंग्रजी मिश्रीत भाषेत सहजपणे संवाद साधतात. जवळच कुणीतरी पंजाबीमध्ये फोनवर बोलत असते, तर अमेरिकेत जन्मलेली …

© 2026 | American Marathi
Logo
  • About
  • Contact
  • Stories
  • आपली अमेरिका
  • कम्युनिटी
  • टेक्नोलॉजी
  • ट्रॅव्हल
  • लाईफ
  • कल्चर
Logo
  • About
  • Contact
  • Stories
  • आपली अमेरिका
  • कम्युनिटी
  • टेक्नोलॉजी
  • ट्रॅव्हल
  • लाईफ
  • कल्चर

Rohit Kulkarni

Founder,American Marathi

Hi,this is a dummy bio and can be replaced. Thank you!

अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांपैकी किती टक्के लोक मराठी बोलतात?

जेव्हा कॉलेज आकसत …गावही कोसळतं

नाश्त्याचे सीरिअल आरोग्यदायी आहेत का? हार्वर्डच्या नव्या संशोधनातून काय समोर आले?