• About
  • Contact
  • Stories
  • आपली अमेरिका
  • कम्युनिटी
  • टेक्नोलॉजी
  • ट्रॅव्हल
  • लाईफ
  • कल्चर
Logo
  • About
  • Contact
  • Stories
  • आपली अमेरिका
  • कम्युनिटी
  • टेक्नोलॉजी
  • ट्रॅव्हल
  • लाईफ
  • कल्चर
Logo
Logo
लाईफ

आरोग्य सुधारण्याचा सर्वात सोपा उपाय

2 Mins read
nebulacontentinc
walking

बुटीक फिटनेस स्टुडिओ आणि हाय इंटेन्सिटी व्यायामाच्या युगात फिटनेस सुधारण्याच्या एका साध्या उपायाचा अनेकांना विसर पडतो – चालणे.

चालण्याला एक व्यायामाचा प्रकार मानायला गेली कित्येक वर्षं कोणाचीच तयारीच नव्हती. पण आता

सर्वसामान्य जनतेला आणि संशोधकांनाही पटतंय की रोजचा साधा फेरफटकाही तुमचं आरोग्य कमालीचं सुधारू शकतो. शाऱिरिक हालचालीचं महत्व तज्ञ अनेक वर्षं सांगत आहेतच. पण अलीकडे झालेल्या संशोधनांतून चालण्याचे

आरोग्यदायी फायदे आणखी स्पष्ट होत आहेत.

व्हँडरबिल्ट युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरमधल्या संशोधकांना असे दिसलंय की रोज काही वेळ केलेला ब्रिस्क वॉक अकाली मृत्यू आणि हृदयरोगाचा धोका लक्षणीयरीत्या कमी करतो. म्हणजेच तुम्हाला फिट ठेवण्यासाठी जोरदार व्यायामाचीच गरज असते असं काही नाही. सातत्याने केलेली शारिरीक हालचालही तुमचं आरोग्य सुधारू शकते.

तज्ञांच्या मते चालण्याने ह्रदयाची ताकद वाढते. ब्लडप्रेशर आणि ब्लड सर्क्युलेशन सुधारतं. अमेरिकन हार्ट असोसिएशन म्हणतं की नियमित चालण्याने कोरोनरी ह्रदयरोग आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो तसंच कोलेस्टेरॉल आणि ब्लड शुगरवर नियंत्रण राहतं. ज्येष्ठ नागरिक आणि दीर्घ आजार असलेल्या व्यक्तींसाठी चालणं अत्यंत फायदेशीर आहे.

चालण्यामुळे होणारे फायदे फक्त हृदयापुरते मर्यादित नाहीत. हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या संशोधकांनी असं म्हटलंय की रोजचा साधा स्टेप काऊंट जरी वाढवला तरी अकाली मृत्यूच्या धोक्यामध्ये घट होऊ शकते. काही अभ्यासांमध्ये असं दिसून आले आहे की दररोज सुमारे ७,००० स्टेप्स चालणाऱ्या व्यक्तींमध्ये बैठी जीवनशैली असणाऱ्यांच्या तुलनेत हृदयरोगाचे प्रमाण कमी असतं. यातून हेच स्पष्ट होतं की आरोग्य सुधारायला नको तेवढ्या कठोर प्रयत्नांची गरज नसते. लहान आणि सातत्यपूर्ण बदलही प्रभावी ठरतात.

चालणं हे वजन नियंत्रण आणि मेटाबॉलिक आरोग्यासाठीसुध्दा महत्त्वाचं आहे. नियमित चालण्याने टाईप-२ डायबिटीस आणि इन्सुलिन सेन्सिटिव्हीटी टाळणं किंवा मॅनेज करणं सहज शक्य होतं.

चालणं हा लो-इंपॅक्ट (low-impact) व्यायामप्रकार असल्यामुळे त्याचा सांधे आणि स्नायूंवर कमी ताण येतो आणि म्हणूनच तुलनेने कमी फिट असणारेही चालण्यातून त्याचं आरोग्य सुधारू शकतात.

चालण्यामुळे मानसिक आरोग्यही सुधारतं. मानसशास्त्रज्ञ आणि न्यूरोलॉजिस्ट्स सांगतात की चालण्याने आपल्या शरीरात एंडॉर्फिन हे हॉर्मोन तयार होते. हे हॉर्मोन मानसिक स्थिती सुधारतं आणि स्ट्रेस कमी करतं.

घराबाहेर नैसर्गिक वातावरणात चालणं तर आणखीनच उत्तम!

मानवी मेंदूसंबंधी आतापर्यंत झालेले अभ्यास सतत दाखवतात की नियमित चालण्याने स्मरणशक्ती टिकवायला आणि वयानुयार त्या होणाऱ्या ऱ्हासामध्ये घट व्हायला मदत होते. संशोधकांच्या मते चालल्याने मेंदूकडे वाढणारा रक्तप्रवाह आणि अतिरिक्त ऑक्सिजनपुरठा यासाठी कारणीभूत ठरतो. बैठी जीवनशैली वाढलेल्या आजच्या काळात हे निष्कर्ष नक्कीच महत्त्वाचे आहेत.

सगळ्यात मजेदार गोष्ट म्हणजे चालण्यासाठी इतर व्यायाप्रकारांना लागतात तशी कोणतीही महागडी मशीन्स किंवा जिम मेंबरशिप वगैरेची गरज नाही. आठवड्याला किमान १५० मिनिटं मध्यम स्वरूपाची शारिरीक हालचाल करणं आवश्यक आहे असं आरोग्याच्या गाईडलाईन्स सांगतात. चालण्याने हे सहज शक्य होतं.

आणखी एक बाब म्हणजे चालण्याचा तुमच्या जीवनात एक व्यायामप्रकार म्हणून समावेश करताना त्यात तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे बदल करू शकता. घरी रोज चालणं शक्य नसेल तर तुम्ही ऑफिसमध्ये मोकळ्या वेळात एक फेरफटका मारू शकता. घरी वेळ असेल तर ईव्हनिंग वॉकला जाऊ शकता. लिफ्टऐवजी जिन्याचा वापर करू शकता.

ऑप्शन्स भरपूर आहेत!

चालण्याकडे फक्त विरंगुळा म्हणून न बघता एक प्रिव्हेंटिव्ह, आरोग्यदायी पर्याय म्हणून त्याचा जीवनातसमावेश करण्याचा सल्ला डॉक्टर्स मोठ्या प्रमाणावर देत आहेत. फिटनेस सुधारण्याचा मार्ग फक्त जिममधून सुरू व्हावा असं काही नाही. घरातून बाहेर पडा, बघा किती मस्त हवा आहे ते, आणि मारा एक रपेट! आरोग्याचे फायदे तुमच्या मागोमाग तुम्हाला शोधत येतील.

Sharing is Caring
Write Comment
Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कथा फर्स्ट अमेंडमेंटची

Photo of the week

St. Louis, Missouri, USA Skyline

सेंट लुईस हे मिसुरी राज्यातील मिसिसिपी नदीकिनारी वसलेलं एक मोठं शहर आहे. इथलं प्रसिद्ध ६३० फूट उंच Gateway Arch स्मारक १९६० च्या दशकात बांधण्यात आलं. हे स्मारक Lewis आणि Clark यांच्या १९व्या शतकाच्या सुरुवातीच्या मोहिमांना आणि अमेरिकेच्या पश्चिमेकडील विस्ताराच्या इतिहासाला समर्पित आहे.

Most Popular

चाटानुगा : नजरेआडचं सीनिक सीक्रेट 

Chattanooga, Tennessee, USA city

गणिताचा तपस्वी: प्रा. श्रीराम शंकर अभ्यंकर

Abhyankar_Grothendieck_1536x1024

आकाशाला गवसणी घालणारे शहर

Skyline of Chicago, United States
Categories
Lifestyle
Technology
Travel
Tags
250 years of USA adventure American Chattanooga Founding Fathers fun gem hidden IndiaAmerican Indian John Admas Marathi President Travel USa USA history
You might also like
Thomas Jefferson resized
आपली अमेरिका

अमेरिकेच्या स्वातंत्र्योत्सवाची २५० वर्षं: देश घडवणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची  गोष्ट:थॉमस जेफरसन

4 Mins read
July 15, 2026

एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व, थोर विचारवंत आणि अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा व राष्ट्राचा शिल्पकार. स्वातंत्र्य,व्यक्तिस्वातंत्र्य आणि  लोकशाही या मूल्यांवर ठाम असणारे थाॅमस जेफरसन यांनी अमेरिकेच्या इतिहासावर अमिट ठसा उमटवला. त्यांनी लिहिलेल्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याने (Declaration of Independence) एका नव्या राष्ट्राचा पाया घातला. अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष, दूरदृष्टीचे नेते आणि शिक्षणाचे समर्थक म्हणून त्यांचे नाव आजही मोठ्या आदराने घेतले जाते. सुरुवातीचे …

Side view of young Caucasian businesswoman in headset giving presentation in the auditorium
लाईफ

 हायस्कुलमधल्या विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा 

3 Mins read
July 13, 2026

लेखक: वेद रानडे वेद कॅटी, टेक्सास येथील हायस्कूलमधील  विद्यार्थी आपल्या अंगी असणाऱ्या काही सर्वात महत्त्वाच्या कौशल्यांपैकी एक म्हणजे प्रभावीपणे संवाद साधण्याची क्षमता असं आजच्या जगात मानलं जातं. आपण जाणता अजाणता दररोजच संवाद साधत असतो भलेही तो शाब्दिक असो वा नसो. शाळेतल्या वरच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना या वयात आपल्यामध्ये नवीन कौशल्य विकसित करता येतात आणि भविष्यात उच्च शिक्षण घेताना, …

Close up of man using smart phone while paying to a waiter in a cafe.
टेक्नोलॉजी

तांत्रिक क्रांतीची दोन रूपं – भारतातला UPI आणि अमेरिकेतला AI 

4 Mins read
July 10, 2026

लेखक: विनायक काळे भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये सतत प्रवास करणाऱ्या कोणालाही एक गोष्ट लगेच जाणवते. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), क्लाउड कॉम्प्युटिंग आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये अमेरिका जगात आघाडीवर असली, तरी रोजच्या व्यवहारांमध्ये भारत अनेक बाबतीत कितीतरी पुढे असल्याचं दिसतं. पुणे, मुंबईसारख्या एखाद्या मोठया शहरातल्या किंवा एखाद्या छोट्या शहरातल्या हमरस्त्यावरून जर गेलात, तर तुमच्या लक्षात येईल की …

© 2026 | American Marathi
Logo
  • About
  • Contact
  • Stories
  • आपली अमेरिका
  • कम्युनिटी
  • टेक्नोलॉजी
  • ट्रॅव्हल
  • लाईफ
  • कल्चर
Logo
  • About
  • Contact
  • Stories
  • आपली अमेरिका
  • कम्युनिटी
  • टेक्नोलॉजी
  • ट्रॅव्हल
  • लाईफ
  • कल्चर

Rohit Kulkarni

Founder,American Marathi

Hi,this is a dummy bio and can be replaced. Thank you!

अमेरिकेच्या स्वातंत्र्योत्सवाची २५० वर्षं: देश घडवणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची  गोष्ट:थॉमस जेफरसन

 हायस्कुलमधल्या विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा 

तांत्रिक क्रांतीची दोन रूपं – भारतातला UPI आणि अमेरिकेतला AI