सर्वात सोप्या AP पासून सर्वात कठीण AP पर्यंत-नऊ AP Classes आणि Exams दिल्यानंतर एका विद्यार्थ्याने सांगितला आपला अनुभव —
अमेरिकेत हायस्कूलमध्ये शिकताना Advanced Placement किंवा AP Classes घेणे हा कॉलेजच्या तयारीचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. AP Classes मुळे विद्यार्थ्यांना नेहमीपेक्षा अधिक कठीण आणि कॉलेजच्या पातळीचा अभ्यास करण्याची संधी मिळते. काही AP Exams मध्ये चांगले गुण मिळाल्यास कॉलेजमध्ये त्याचे Credits मिळू शकतात. त्यामुळे पुढे कॉलेजमध्ये काही Classes घेण्याची गरज कमी होऊ शकते आणि हजारो डॉलर्सची बचतही होऊ शकते.
मी सध्या हायस्कूलच्या Senior Year मध्ये आहे. आतापर्यंत मी नऊ AP Classes घेतले आहेत आणि हायस्कूल पूर्ण होईपर्यंत एकूण १५ AP Classes घेण्याचा माझा विचार आहे. या लेखात मी आतापर्यंत दिलेल्या नऊ AP Exams ची माझ्या अनुभवावर आधारित क्रमवारी देत आहे—सर्वात सोप्या परीक्षेपासून सर्वात कठीण परीक्षेपर्यंत. या Classes मध्ये काय अपेक्षित असते, अभ्यास कसा करावा आणि यशस्वी होण्यासाठी काय करावे, हेही माझ्या अनुभवातून सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे.
- AP Psychology — माझ्या मते सर्वात सोपी
मी Sophomore Year मध्ये AP Psychology घेतले होते आणि हा Class मी प्रत्यक्ष शाळेत केला. या परीक्षेत मला 5 मिळाले, जे AP Exam मधील सर्वाधिक Score आहे. AP Exams मध्ये 1 ते 5 असे Scoring असते. साधारणपणे 3 किंवा त्यापेक्षा जास्त Score म्हणजे परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे मानले जाते आणि अनेक कॉलेजेस त्यासाठी Credit देतात. माझ्या मते AP Psychology सर्वात सोपी होती, कारण यात प्रामुख्याने वेगवेगळ्या संकल्पना आणि व्याख्या लक्षात ठेवाव्या लागतात. काही प्रश्नांमध्ये त्या संकल्पना विशिष्ट परिस्थितीत वापराव्या लागतात, पण ते फार कठीण वाटले नाही. परीक्षेतील Free Response Questions म्हणजेच FRQ दोन भागांत असतात आणि त्यांचा एकत्रित वाटा सुमारे 33 टक्के असतो. एका भागात Research Method, Variables, Ethics आणि Data याबद्दल प्रश्न असतात. दुसऱ्या भागात Psychology शी संबंधित प्रश्नावर छोटा Essay लिहावा लागतो. Pre-Med किंवा Psychology मध्ये पुढे जाण्याचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा Class चांगला पर्याय आहे. तसेच पहिल्यांदा AP घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही तो उपयोगी ठरू शकतो. - AP Environmental Science
मी Junior Year मध्ये AP Environmental Science (APES) घेतले. मला परीक्षेत 4 मिळाले. तरीही माझ्या मते हा मी घेतलेल्या AP Classes पैकी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात सोपा Class होता. यामध्ये Fossil Fuels, Carbon आणि Nitrogen Cycles, Pollution अशा पर्यावरणाशी संबंधित मूलभूत गोष्टी शिकवल्या जातात. इतर AP Science Classes च्या तुलनेत या संकल्पना समजायला तुलनेने सोप्या वाटल्या. AP Exam मध्ये 60 टक्के Multiple Choice Questions (MCQ) आणि 40 टक्के FRQ असतात. अनेक MCQ प्रश्नांची उत्तरे Process of Elimination वापरून शोधता येतात. FRQ मध्येही फार विशिष्ट माहिती विचारण्याऐवजी दिलेल्या Environmental Data वरून निष्कर्ष काढणे किंवा एखाद्या पर्यावरणीय समस्येवर उपाय सुचवणे असे प्रश्न असतात. Environmental Science संबंधित Major नसल्यास या Credit चा प्रत्येकाला उपयोग होईलच असे नाही. मात्र AP Classes चा अनुभव घेण्यासाठी हा चांगला पर्याय आहे. - AP Seminar
AP Seminar इतर AP Exams पेक्षा खूप वेगळा आहे. कारण या परीक्षेचा मोठा भाग तुम्ही प्रत्यक्ष Exam Hall मध्ये जाण्यापूर्वीच पूर्ण केलेला असतो. या Class मध्ये Presentations, Research आणि Essays यावर जास्त भर असतो. AP Exam च्या 55 टक्के भागात Performance Task One आणि Performance Task Two असतात. Performance Task One मध्ये Team म्हणून एखादा विषय निवडून त्यावर Research करायचे, त्यावर उपाय सुचवायचा आणि Multimedia Presentation द्यायचे असते. प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या विषयाच्या विशिष्ट बाजूवर Individual Research Report (IRR) देखील लिहावा लागतो. Performance Task Two मध्ये Individual Multimedia Presentation आणि Individual Written Argument असत. परीक्षेतील उरलेल्या भागात EOC A आणि EOC B लिहावे लागतात. यामध्ये Argument Analysis आणि Synthesis Essay यांचा समावेश असतो. हे ऐकायला खूप वाटत असले तरी यातील बराचसा भाग Class मध्येच पूर्ण होतो. त्यामुळे काम व्यवस्थित नियोजन करून करता येते. मला या परीक्षेत 5 मिळाले. Public Speaking, Writing आणि Critical Thinking सुधारण्यासाठी हा Class खूप उपयोगी आहे. पुढे AP Research घेण्याचा विचार असेल तर AP Seminar चांगला पाया तयार करतो. - AP Precalculus
AP Precalculus हा तुलनेने नवीन AP Class आहे. College Board ने 2022 मध्ये त्याची घोषणा केली आणि 2023-24 पासून AP Precalculus सुरू झाला. यामध्ये Unit Circle, Trigonometry आणि Polar Functions यांसारख्या संकल्पना शिकवल्या जातात. पुढे AP Calculus घेण्यापूर्वी हा Class चांगली तयारी करून घेतो. परीक्षेत Calculator न वापरता सोडवायचे 28 MCQ आणि Calculator वापरून सोडवायचे 12 MCQ असतात. याशिवाय चार भागांचा FRQ Section असतो. मला या परीक्षेत 5 मिळाले. मात्र FRQ मधील Word Problems मध्ये विचार करून योग्य पद्धत निवडावी लागत असल्याने हा भाग थोडा अवघड वाटू शकतो. - AP English Language and Composition
AP English Language and Composition किंवा AP Lang हा हायस्कूलमधील अत्यंत उपयोगी AP Classes पैकी एक आहे.
या Class मध्ये वर्षभर भरपूर Essays लिहावे लागतात. त्यामुळे College मध्ये आवश्यक असणारी Writing आणि Critical Thinking Skills विकसित होतात.
मुख्यतः तीन प्रकारचे Essays असतात—Q1, Q2 आणि Q3.
Q1 मध्ये काही Documents दिले जातात आणि त्यांचा आधार घेऊन Argument तयार करावा लागतो.
Q2 मध्ये लेखकाने वापरलेल्या Rhetorical Techniques चे विश्लेषण करावे लागते.
Q3 मध्ये कोणताही Passage दिलेला नसतो. एखाद्या विचारावर किंवा मुद्द्यावर स्वतःची स्पष्ट भूमिका घेऊन Essay लिहावा लागतो.
AP Exam मध्ये MCQ चा वाटा 45 टक्के आहे आणि उर्वरित भागात हे तीन Essays लिहावे लागतात.
मला या परीक्षेत 5 मिळाले. तरीही कमी वेळात तीन वेगवेगळ्या प्रकारचे Essays लिहिणे आव्हानात्मक होते. College साठी English Credits मिळवण्याबरोबरच विचार करण्याची आणि लिखाणाची क्षमता विकसित करण्यासाठी हा Class खूप उपयोगी आहे. - AP Micro economics
मी Junior Year च्या दुसऱ्या Semester मध्ये AP Micro economics घेतले होते . अभ्यासाच्या दृष्टीने मला हा हायस्कूलमधील सर्वात आवडलेल्या Classes पैकी एक वाटला. Micro economics मध्ये अर्थव्यवस्थेचा छोट्या पातळीवर अभ्यास केला जातो. वेगवेगळ्या प्रकारच्या Markets, कंपन्या कर्मचारी कसे नियुक्त करतात, Profit Maximization अशा संकल्पना शिकवल्या जातात. या Class मध्ये अनेक Graphs असतात आणि ते अचूक काढणे महत्त्वाचे असते. Labeling मध्ये छोटी चूक झाली तरी Points जाऊ शकतात. परीक्षेत MCQ चा वाटा 66 टक्के आणि FRQ चा 34% आहे. मला 5 मिळाले. मात्र अनेक Graphs, Definitions आणि त्यांचा योग्य वापर यामुळे ही परीक्षा आधीच्या परीक्षांपेक्षा कठीण वाटली. तरीही Economics समजून घेण्यासाठी हा अतिशय रंजक Class आहे आणि मी इतर विद्यार्थ्यांनाही तो घेण्याची शिफारस करेन. - AP Macro economics आणि
AP Micro economics सोबतच मी Junior Year च्या पहिल्या Semester मध्ये AP Macro economics घेतले.
Micro मध्ये अर्थव्यवस्थेचा छोट्या पातळीवर अभ्यास केला जातो, तर Macro मध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेकडे मोठ्या दृष्टिकोनातून पाहिले जाते.
GDP, Inflation, Supply आणि Demand यासारख्या संकल्पनांचा यात अभ्यास केला जातो.
Macro मध्येही Graphs महत्त्वाचे आहेत. मात्र माझ्या मते या विषयातील सर्वात कठीण भाग म्हणजे वेगवेगळ्या आर्थिक संकल्पनांमधील संबंध अचूक समजून घेणे. एका संकल्पनेचे ज्ञान पुढची संकल्पना समजण्यासाठी आवश्यक असते. त्यामुळे सुरुवातीपासूनच अभ्यास नीट करणे महत्त्वाचे आहे.
मला या परीक्षेतही 5 मिळाले. पण मी हा Class पहिल्या Semester मध्ये घेतल्यामुळे AP Exam च्या वेळी आधी शिकलेल्या अनेक गोष्टींची पुन्हा उजळणी करावी लागली.
Economics आणि Politics अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा Class नक्कीच उपयोगी आहे.
- AP U.S. History- AP U.S. History (APUSH) हा या यादीतील एकमेव Class आहे जो मी Online घेतला. त्यामुळे प्रत्यक्ष Class किती कठीण असतो याबद्दल मी सांगू शकत नाही, पण AP Exam चा माझा अनुभव नक्कीच सांगू शकतो.
या परीक्षेतील सर्वात मोठे आव्हान म्हणजे जवळपास 300 वर्षांच्या अमेरिकन इतिहासाचा अभ्यास.
MCQ चा वाटा 40 टक्के असतो. Free Response Section मध्ये तीन प्रमुख भाग आहेत—SAQ (Short Answer Question), DBQ (Document Based Question) आणि LEQ (Long Essay Question).
SAQ चा वाटा 20 टक्के, DBQ चा 25 टक्के आणि LEQ चा 15 टक्के आहे.
इतिहासातील माहिती फक्त लक्षात ठेवून उपयोग होत नाही. त्या माहितीचे विश्लेषण करून त्यावर Argument तयार करता आल पाहिजे. त्यामुळे मला ही परीक्षा खूप कठीण वाटली.
मला 5 मिळाले, पण त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली.
College मध्ये History Credits मिळवण्यासाठी आणि Writing Skills मजबूत करण्यासाठी APUSH खूप उपयोगी ठरू शकतो. - AP Statistics — माझ्यासाठी सर्वात कठीण विषय होता .

सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट करणे महत्त्वाचे आहे की कोणती AP परीक्षा सर्वात कठीण आहे हे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वेगळे असू शकते.
प्रत्येकाची आवड, अभ्यासाची पद्धत आणि आकलन शक्ती वेगवेगळी असते. ही क्रमवारी पूर्णपणे माझ्या वैयक्तिक अनुभवावर आधारित आहे.
माझ्यासाठी सर्वात कठीण परीक्षा होती AP Statistics.
हा Class इतर Math Classes पेक्षा वेगळा आहे. यात Formulas आणि Calculator वापरण्याबरोबरच Abstract Thinking चीही गरज असते.
MCQ Section मला तुलनेने सोपा वाटला. मात्र Free Response Section खूप आव्हानात्मक होता.
FRQ मध्ये सहा वेगवेगळे भाग असतात कारण, संपूर्ण Curriculum मधील अनेक वेगवेगळ्या संकल्पनांचा यात वापर करावा लागतो. त्यात वेळेची मर्यादाही असल्यामुळे हा भाग अधिक कठीण वाटतो या परीक्षेत मला 4 मिळाले. इतर AP Exams च्या तुलनेत हा Score मिळवण्यासाठी मला निश्चितच जास्त मेहनत घ्यावी लागली.
माझा अनुभव काय सांगतो?
AP Classes घेण्याचा फायदा फक्त College Credits मिळवण्यापुरता मर्यादित नाही. या Classes मुळे Critical Thinking, Analysis, Research, Writing, Time Management आणि Problem-Solving यासारखी महत्त्वाची कौशल्ये विकसित होतात.
मी दिलेली ही क्रमवारी माझ्या स्वतःच्या अनुभवावर आधारित आहे. दुसऱ्या विद्यार्थ्याला AP Statistics सोपे वाटू शकते आणि AP Psychology कठीण. त्यामुळे फक्त एखादा AP Class सोपा किंवा कठीण आहे म्हणून तो निवडणे योग्य नाही.
आपली आवड, पुढे College मध्ये कोणता विषय शिकायचा आहे आणि आपल्याला कोणत्या प्रकारचा अभ्यास आवडतो, हे लक्षात घेऊन AP Classes निवडणे अधिक महत्त्वाचे आहे.
माझ्यासाठी या नऊ AP Classes चा अनुभव वेगवेगळा राहिला. काही परीक्षांसाठी भरपूर पाठांतर करावे लागले तर काहींसाठी लेखन, काहींसाठी Graphs आणि काहींसाठी कठीण विश्लेषण. पण या सगळ्या अनुभवातून एक गोष्ट निश्चित शिकायला मिळाली—AP Classes तुम्हाला फक्त एका परीक्षेसाठी तयार करत नाहीत तर ते कॉलेजमध्ये अपेक्षित असलेल्या अभ्यासाच्या पद्धतीचीही ओळख करून देतात.



