• About
  • Contact
  • Stories
  • आपली अमेरिका
  • कम्युनिटी
  • टेक्नोलॉजी
  • ट्रॅव्हल
  • लाईफ
  • कल्चर
Logo
  • About
  • Contact
  • Stories
  • आपली अमेरिका
  • कम्युनिटी
  • टेक्नोलॉजी
  • ट्रॅव्हल
  • लाईफ
  • कल्चर
Logo
Logo
लाईफ

अमेरिकेच्या स्वातंत्र्योत्सवाची २५० वर्षं: देश घडवणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची  गोष्ट: अलेक्झांडर हॅमिल्टन

4 Mins read
nebulacontentinc
Alexander-Hamilton-1672x941

अलेक्झांडर हॅमिल्टन

अमेरिकेच्या अर्थिक व्यवस्थे चा शिल्पकार :
अत्यंत कठीण परिस्थितीतून पुढे आलेल्या अलेक्झांडर हॅमिल्टन यांनी आपल्या बुद्धीमत्ता, महत्त्वकांक्षा आणि जिद्दीच्या जोरावर अमेरिकेच्या संस्थापकांमधे महत्वाचे स्थान मिळवले. एक मजबूत केंद्र सरकार, आर्थिक स्थैर्य आणि देशाची एकता यावर त्यांचा ठाम विश्वास होता.आजही अमेरिकेच्या आर्थिक आणि राजकीय व्यवस्थेवर त्यांच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो.

बालपण :

अलेक्झांडर हॅमिल्टन यांचा जन्म 11 जानेवारी 1755 कींवा 1757 रोजी कॅरेबियन मधील नेव्हीस बेटावर झाला.त्यांच्या जन्मवर्षां बाबत इतिहासकारांमधे मतभेद आहेत. त्यांची आई रेचल फाॅसेट आणि वडील जेम्स हॅमिल्टन हे स्काॅटिश व्यापारी होते.

हॅमिल्टन यांचे बालपण अत्यंत कठीण परिस्थितीत गेले. वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी त्यांनी आई -वडीलांचे छत्र गमावले त्यामुळे काही काळ
ते नातेवाईकांकडे राहिले, त्यानंतर सेंट क्राॅइक्स येथील बीकमन अँड क्रूगर या व्यापारी कंपनीत त्यांनी क्लार्क म्हणून काम सुरू केले.
अगदी लहान वयातच त्यांनी व्यापार, जहाज वहातूक आणि आर्थिक व्यवहार याचे ज्ञान मिळवले. त्यांची बुद्धीमत्ता आणि लेखन कौशल्यही लवकरच लोकांच्या लक्षात आले.

एका भिषण चक्रीवादळाबददल त्यांनी लिहीलेल्या प्रभावी पत्रामुळे स्थानिक लोक प्रभावित झाले. त्यांच्या शिक्षणासाठी पैसे गोळा करण्यात आले.
आणि 1772 मध्ये हॅमिल्टन न्युयॉर्क ला आले.
तेथे त्यांनी किंग्ज काॅलेज मध्ये– म्हणजेच आजच्या कोलंबिया युनिव्हर्सिटीत शिक्षण घेतले. तत्वज्ञान, कायदा, आणि क्रांतिकारी विचारांचा त्यांनी सखोल अभ्यास केला.

अमेरिकन क्रांती:

ब्रिटन आणि अमेरिकन वसाहती मधील संघर्ष वाढू लागल्या नंतर हॅमिल्टन यांनी ब्रिटिश राजवटी विरुद्ध लेखन करु लागले.
1775 मध्ये अवघ्या विसाव्या वर्षी, ते न्यूयॉर्कच्या मिलिशिया मध्ये सामील झाले व पुढे ते तोफखाना तुकडीचे कॅप्टन झाले . ट्रेंटन लढाईतील त्यांच्या कामगिरीने जनरल जॉर्ज वॉशिंग्टन यांचे लक्ष वेधून घेतले.

1777 मध्ये वॉशिंग्टन यांनी त्यांची एड – डी- कॅम्प म्हणून नियुक्ती केली आणि त्यांना लेफ्टनंट कर्नल चा दर्जा मिळाला. हॅमिल्टन पत्रव्यवहार,युद्धाची तयारी आणि सैन्याच्या व्यवस्थापनात महत्वाची भूमिका बजावत होते. मात्र त्यांना प्रत्यक्ष युद्धभूमीवर नेतृत्व करायचे होते. 1781 मध्ये त्यांनी वॉशिंग्टन यांच्या स्टाफ मधील पद सोडले .

याॅर्कटाउनच्या निर्णायक लढाईत त्यांनी ब्रिटिश सैन्याच्या तटबंदीवर धाडसी हल्ल्याचे नेतृत्व केले. या विजयानंतर अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाचा शेवट जवळ आला. या अनुभवातून हॅमिल्टन यांना एक गोष्ट स्पष्ट झाली की नव्या अमेरिकेला मजबूत केंद्र सरकारची गरज आहे.

युद्धानंतरचे आयुष्य:

1780 मध्ये हॅमिल्टन यांनी एलिझाबेथ शायलर यांच्याशी विवाह केला. शायलर कुटुंब न्युयॉर्क मधील एक प्रभावशाली कुटुंब होते. हॅमिल्टन यांनी कायद्याचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर वकीली सुरू केली आणि मग 1782 मध्ये ते काॅनफेडरेशन काँग्रेस वर निवडुन गेले. त्या काळातील केंद्र सरकार कडे कर आकारण्याचे कींवा व्यापार नियंत्रित करण्याचे पुरेसे अधिकार नव्हते व त्यामुळे हॅमिल्टन अस्वस्थ होते. 1786 मधील शेज रिबेलियन या बंडानंतर मजबूत केंद्र सरकारची गरज असल्याचा त्यांचा विश्वास आणखी दृढ झाला.

संविधान निर्मिती :

1787 मध्ये फिलाडेल्फियात झालेल्या घटनात्मक परीषदेत हॅमिल्टन सहभागी झाले. त्यांनी काही प्रस्ताव मांडले परन्तु त्यांचे काही प्रस्ताव इतर प्रतीनिधींना खूपच केंद्रीभूत आणि ब्रिटिश व्यवस्थेसारखे वाटले , त्यामूळे ते स्वीकारले गेले नाहीत. मात्र , अमेरिकेच्या संविधानाला लोकांचा पाठिंबा मिळवून देण्यात हॅमिल्टन यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण भुमिका बजावली.nजेम्स मॅडिसन आणि जाॅन जे यांच्यासोबत त्यांनी प्रसिद्ध “द फेडरलीस्ट पेपर्स” लिहीले. या लेखांमधून नव्या संविधानाची गरज आणि मजबूत केंद्र सरकारचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.

अमेरिकेचे पाहिले ट्रेझरी सेक्रेटरी :

1789 मध्ये राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांनी हॅमिल्टन यांची अमेरिकेचे पहिले सेक्रेटरी ऑफ द ट्रेझरी म्हणून नियुक्ती केली. व अमेरिकेची अर्थिक व्यवस्था स्थिर करण्यासाठी त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. राज्यांची कर्ज केंद्र सरकारने स्वीकारावीत, देशात नॅशनल बँक स्थापन करावी आणि अमेरिकन उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आयातीवर कर लावावेत अशी त्यांची योजना होती. थाॅमस जेफरसन आणि जेम्स मॅडिसन यांनी त्यांच्या योजनांना विरोध केला. मात्र अखेर एक ऐतिहासिक तडजोड झाली.

हॅमिल्टन यांच्या आर्थिक योजनेला पाठिंबा देण्याच्या बदल्यात अमेरिकेची राजधानी पोटोमॅक नदीच्या परिसरात नेण्याचे मान्य करण्यात आले. आणि मग पुढे याच परिसरात वॉशिंग्टन डी.सी. उभे राहिले.

अमेरिकेच्या महत्वाच्या संस्थांमध्ये योगदान:

हॅमिल्टन यांचा प्रभाव केवळ अर्थ व्यवस्थेपुरता मर्यादित नव्हता तर 1784 मध्ये त्यांनी बॅक ऑफ न्युयॉर्कची स्थापना केली. तसेच 1790 मध्ये त्यांनी रेव्हेन्यू कटर सर्विस स्थापन केली, व पुढे हीच संस्था अमेरिकेच्या कोस्ट गार्डची पूर्वसुची ठरली.
1801 मध्ये त्यांनी न्युयॉर्क इव्हिनिंग पोस्ट हे वृत्तपत्र सुद्धा सुरू केले .
कायदा, अर्थव्यवस्था आणि मजबूत संस्था यांच्या आधारावरच अमेरिका उभी रहावी हा त्यांच्या या सर्व प्रयत्नांमागील विचार होता.

1800 ची निवडणूक :

सरकारी पदावर नसतानाही हॅमिल्टन यांचा अमेरिकेतील राजकारणावर मोठा प्रभाव होता. 1800 च्या अध्यक्षीय निवडणुकीत थाॅमस जेफरसन आणि ॲरन बर यांच्यात चुरस निर्माण झाली. हॅमिल्टन यांचे जेफरसन यांच्याशी गंभीर राजकीय मतभेद होते. तरीही त्यांना ॲरन बर यांच्यापेक्षा जेफरसन यांच्याबद्दल अथिक विश्वास वाटत होता त्यामुळेच त्यांनी फेडरलीस्ट सदस्यांना जेफरसन यांना पाठिंबा देण्यास सांगितले, आणि याचाच परिणाम पुढे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही झाला.

द्वंद्वयुद्ध आणि मृत्यु :

हॅमिल्टन आणि ॲरन बर यांच्यातील राजकीय संघर्ष पुढे वैयक्तिक शत्रुत्वात बदलला आणि इतका विकोपाला गेला की 11जुलै 1804 रोजी न्यूजर्सीतील वीहाॅकेन येथे दोघांमधे प्रसिद्ध द्वंद्वयुद्ध झाले की बर यांनी झाडलेल्या गोळीने हॅमिल्टन गंभीर जखमी झाल्यामुळे हॅमिल्टन यांचा दुसर्‍या दिवशी मृत्यु झाला. तेव्हा ते अवघे 49 वर्षांचे होते.

एका अनाथ मुलापासून ते अमेरिकेच्या अर्थिक व्यवस्थे च्या शिल्पकारा पर्यंतचा हॅमिल्टन यांचा प्रवास अतिशय विलक्षण होता.
आज अमेरिकेच्या दहा डाॅलर च्या नोटेवर त्यांचे चित्र आहे, देशाच्या आर्थिक पायाभरणीत त्यांनी बजावलेल्या भूमिकेची आठवण म्हणून.

Sharing is Caring
Write Comment
Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous Post

अमेरिकेतला गणेशोत्सव: श्रद्धेपासून संस्कृतीपर्यंत

Next Post

ट्रीलियन डाॅलर अर्थव्यवस्था :अमेरिकेतील सरकारी शाळांना एवढा पैसा कुठून मिळतो ?

Photo of the week

Yosemite National Park

अमेरिकेतील निसर्गाचे भव्य आणि सुंदर रूप अनुभवायचे असेल, तर Yosemite National Park हे एक आवर्जून भेट देण्यासारखे ठिकाण आहे. आकाशाला भिडणारे ग्रॅनाइटचे डोंगर, शेकडो फूट उंचीवरून कोसळणारे धबधबे, प्रचंड आकाराची Sequoia झाडे, हिरवीगार कुरणे आणि स्वच्छ डोंगरी तलाव यामुळे Yosemite हे अमेरिकेतील सर्वात प्रसिद्ध National Parks पैकी एक आहे.

Most Popular

AP Classes :एक अनुभव

Students friends at lockers room

अमेरिकेच्या स्वातंत्र्योत्सवाची २५० वर्षं: देश घडवणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची  गोष्ट – जॉन ॲडम्स

John Adams Resized

योसेमिटी नॅशनल पार्क:आयुष्यभर लक्षात राहणारा अनुभव

WhatsApp Image 2026-09-08 at 1.19.19 PM
Categories
Lifestyle
Technology
Travel
Tags
250 years of USA adventure American Chattanooga Founding Fathers fun gem hidden IndiaAmerican Indian John Admas Marathi President Travel USa USA history
You might also like
american_school_under_2mb
लाईफ

ट्रीलियन डाॅलर अर्थव्यवस्था :अमेरिकेतील सरकारी शाळांना एवढा पैसा कुठून मिळतो ?

4 Mins read
October 13, 2026

अमेरिकेत दररोज लाखो मुले सरकारी शाळां मध्ये जातात, न्युयॉर्क सारख्या मोठ्या शहरातील हायस्कूल असो किंवा एखाद्या छोट्या गावातील प्रार्थमिक शाळा शिक्षक वर्गात शिकवतात व स्कूल बसेस मुलांना घेऊन येतात, कॅफेटेरियात जेवण तयार होते आणि कौन्सेलर, लायब्रेरीयन, प्राशिक्षक तसेच विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी काम करणारे कर्मचारी आपली जबाबदारी पार पाडतात. या प्रचंड शिक्षण व्यवस्थे मागे तितकीच …

809133902_1866938554623559_2883314826009152861_n
कम्युनिटी लाईफ

अमेरिकेतला गणेशोत्सव: श्रद्धेपासून संस्कृतीपर्यंत

6 Mins read
September 21, 2026

गेल्या काही वर्षांत अमेरिकेतील गणेशोत्सवाचे स्वरूप मोठ्या प्रमाणावर विस्तारले आहे. २०२६ मध्ये गणेश चतुर्थी १४ सप्टेंबरला असून ती अमेरिकेत सार्वजनिक सुट्टी नसली, तरी न्यू जर्सी, न्यूयॉर्क, फिलाडेल्फिया, वॉशिंग्टन डीसी परिसर, टेक्सास, कॅलिफोर्निया, शिकागो आणि सिएटल सह अनेक शहरांमध्ये मंदिरे, महाराष्ट्र मंडळे आणि इतर भारतीय संस्था सार्वजनिक गणेशोत्सव आयोजित करत आहेत. काही मोठ्या उत्सवांना हजारो भाविक …

WhatsApp Image 2026-09-08 at 1.19.19 PM
ट्रॅव्हल

योसेमिटी नॅशनल पार्क:आयुष्यभर लक्षात राहणारा अनुभव

4 Mins read
September 8, 2026

अमेरिकेतील निसर्गसौंदर्याचा अद्भुत, भव्य व सुंदर अनुभव घ्यायचा असेल तर योसेमिटी नॅशनल पार्क हे एक आवर्जून भेट देण्यासारखे ठिकाण आहे. आकाशाला भिडणारे ग्रॅनाईटचे डोंगर, शेकडो फूट उंचीवरून कोसळणारे धबधबे, प्रचंड आकाराची सिक्वॉया झाडे, हिरवीगार कुरणे आणि स्वच्छ डोंगरी तलाव यामुळेच योसेमिटी हे अमेरिकेतील सर्वात प्रसिद्ध नॅशनल पार्कपैकी एक आहे. कॅलिफोर्नियातील सिएरा नेवाडा पर्वतरांगांमध्ये असलेले योसेमिटी …

© 2026 | American Marathi
Logo
  • About
  • Contact
  • Stories
  • आपली अमेरिका
  • कम्युनिटी
  • टेक्नोलॉजी
  • ट्रॅव्हल
  • लाईफ
  • कल्चर
Logo
  • About
  • Contact
  • Stories
  • आपली अमेरिका
  • कम्युनिटी
  • टेक्नोलॉजी
  • ट्रॅव्हल
  • लाईफ
  • कल्चर

Rohit Kulkarni

Founder,American Marathi

Hi,this is a dummy bio and can be replaced. Thank you!

ट्रीलियन डाॅलर अर्थव्यवस्था :अमेरिकेतील सरकारी शाळांना एवढा पैसा कुठून मिळतो ?

अमेरिकेतला गणेशोत्सव: श्रद्धेपासून संस्कृतीपर्यंत

योसेमिटी नॅशनल पार्क:आयुष्यभर लक्षात राहणारा अनुभव